- ऋजुता लुकतुके
कुस्तीतील लैंगिक शोषणाच्या देशभर गाजत असलेल्या प्रकरणात दिल्लीतील राऊझ न्यायालयाने कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्याविरोधात आरोप निश्चिती करण्याचे आदेश दिले. सहा महिला कुस्तीपटूंनी शरण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यातील पाच कुस्तीपटूंचे आरोप कोर्टाने ग्राह्य धरले. तर उर्वरित एका महिलेनं केलेल्या आरोपातून शरण यांची सुटका करण्यात आली. (Brijbhushan Sharan)
न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी प्रियंका राजपूत शरण (Priyanka Rajput Sharan) यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत असं मत मांडलं. ‘पाच प्रकरणांमध्ये आरोपी ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्याविरोधात आवश्यक ते पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचं कलम ३५४ आणि कलम ३५४ ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याचे आदेश न्यायालय देत आहे,’ असं राजपूत यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. (Brijbhushan Sharan)
कुस्तीपटूंच्या तक्रारी नोंदवताना दिल्ली पोलिसांनी शरण यांना अटक न करता आरोपांची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर केलेल्या तपासानंतर ही कारवाई झाली आहे. सहावी कुस्तीपटू अठरावर्षांखालील आहे. त्यामुळे त्या प्रकरणात शरण यांना पॉक्सो लावावा अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती. पण, या महिलेची तक्रार कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे शरण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई होणार नाही. (Brijbhushan Sharan)
(हेही वाचा- Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या फेरीसह नीरज दुसरा )
गेल्यावर्षी ब्रिजभूषण शरण (Brijbhushan Sharan) यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) या ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत कुस्तीपटूंचं एक आंदोलन उभं राहिलं होतं. जंतर मंतर इथं खेळाडू आंदोलनाला बसले होते. कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून शरण यांची मुदत तेव्हा संपली होती. पण, त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचेच निकटवर्तीय संजय सिंग निवडून आले. त्यामुळे अजूनही आंदोलनकर्त्या कुस्तीपटू नाराज आहेत. शरण यांच्याविरोधात आरोप निश्चिती हे यशाचं पहिलं पाऊल असल्याची प्रतिक्रिया साक्षी मलिकने दिली आहे. पण, आंदोलन आणि लढा अजून संपलेली नाही, असं या खेळाडूंचं म्हणणं आहे. (Brijbhushan Sharan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community