सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत ऑलिंपिक क्रीडा उपक्रमातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2022 पासून ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा 2022-23 मध्ये सहभाग घेतला होता. यात तीन विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
तलवारबाजी खेळातील ईप्पी प्रकारात शलाया यादव याला कांस्य पदक मिळाले. तर साबरे प्रकारात तनिष्क भालेराव याने कांस्य पदक पटकावले. तसेच, फाॅइल गर्ल प्रकारात मनश्री वाघे या विद्यार्थीनेही कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक क्रीडा उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी तसेच निवडक मुलांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात येते.
( हेही वाचा: “जनसामान्यांची दिवाळी गोड करणारा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय” )
विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत निवड
मुलांमध्ये ऑलम्पिक खेळाची गोडी निर्माण व्हावी. तसेच, विद्यार्थ्यांना चांगले वातावरण मिळावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार व्हावेत, मुलांची तालीम एका चांगल्या संस्थेत व्हावी यासाठी छबीलदास शाळेने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे बाॅक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी आणि रायफल शुटींग या ऑलम्पिक खेळांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम 18 जून 2022 पासून सुरु करण्यात आला. त्यामुळे अगदी कमी कालावधीत मुलांनी यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचI अहमदनगर येथे होणा-या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे.
Join Our WhatsApp Community