६ ते ९ सप्टेंबर २०२३ रोजी बेरूत, लेबनॉन येथे संपन्न झालेल्या ५ व्या आशियाई कॅडेट तायक्वोंदो (Twakando) स्पर्धेत अंतिम फेरीतील अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने थायलँडचा पराभव करून कांस्य पदक पटकावले. या यशाने तायक्वोंदो फ्री स्टाइल सांघिक प्हुमसे या प्रकारात हे भारताचे पहिले पदक ठरले आहे. १४ खेळाडूंची भारतीय टीम या स्पर्धेत उतरली होतील, त्यातील ५ जण स्मारकातील सावरकर तायक्वांदो अकॅडमीचे आहेत.
सावरकर स्मारकात होणार सत्कार
या स्पर्धेत सावरकर तायक्वांदो (Twakando) अकॅडमीचे श्रावणी तेली, अक्षरा शानभाग, किआन देसाई, रुद्र खंदारे आणि काव्य धोडाययानॉर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. हे सगळे ५ खेळाडू ब्लॅकबेल्ट आहेत. हे पाच खेळाडू या विजयाचे मानकरी ठरले आहेत. बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता या सर्व खेळाडूंचा सत्कार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वत: सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
Join Our WhatsApp Community