Mohammed Shami अर्ध्यातच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल का?

दुखापतीतून सावरलेला शमी रणजी सामन्यात खेळणार आहे.

48
Mohammed Shami अर्ध्यातच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल का?
Mohammed Shami अर्ध्यातच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल का?
  • ऋजुता लुकतुके

मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताचा स्टार तेज गोलंदाज आहे. सध्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर असला तरी गुरुवारपासून मध्य प्रदेश विरुद्ध रणजी सामना तो खेळणार आहे. तिथे त्याच्या तंदुरुस्तीची परीक्षा होणार आहे. तो तंदुरुस्त ठरला तर मध्यावरच तो ऑस्ट्रेलियाला जाईल का हा आताचा प्रश्न आहे. स्विंग गोलंदाजीच्या बाबतीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे भारताचे अव्वल दोन गोलंदाज आहेत. त्यामुळे शमी भारतीय संघाला हवासा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात तो जास्त उपयुक्त ठरणार आहे. पण, दौऱ्यात मध्यावर तो संघात सामील होतो का प्रश्न आहे.

बीसीसीआयचे (BCCI) फीजिओ नितीन पटेल सध्या शमीची प्रकृती आणि तंदुरुस्ती यावर लक्ष ठेवून असणार आहेत. बंगाल संघाचा सामना इंदूरला होणार आहे. आणि तिथेही नितीन पटेल शमीबरोबर आहेत. ते शामीच्या तंदुरुस्तीचा नियमित अहवाल बीसीसीआयला सादर करणार आहेत. त्यावरून कदाचित शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यावर विचार होऊ शकतो.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा पत्नी आणि मुलांसह ऑस्ट्रेलियात डे – आऊट)

(हेही वाचा – Ind vs SA, 3rd T20 : रममदीप सिंगचा पदार्पणातच एक अनोखा विक्रम)

शामीच्या अनुपस्थितीत भारताचं तेज आक्रमण अननुभवी आहे. मुख्य जबाबदारी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजवर असणार आहे. तर त्यांच्या जोडीला आहेत आकाशदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, निशित कुमार रेड्डी आणि हर्षित राणा हे खेळाडू. सिराज आणि बुमराह वगळता इतर तिघांचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा आहे. तर हर्षित आणि नितिश यांना अजूनही पदार्पणाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला शमीची उणीव भासणार हे नक्की आहे.

रणजी सामन्यात शमी पूर्ण जोमाने गोंलदाजी करणार आहे. आणि त्यानंतरच त्याची सामन्यासाठीची तंदुरुस्ती कळू शकेल. मोहम्मद शमी (Mohammed Shami) नोव्हेंबर २०२३ नंतर क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या घोट्याची दुखापत सुरुवातीला विश्रांतीने बरी होईल असा अंदाज होता. पण, शेवटी एप्रिल महिन्याच्या त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. तेव्हापासून शमी बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत सराव करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.