भारत आणि कॅनडा (Canada) यांच्यात वाद निर्माण होण्यास कारणीभूत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले बिनबुडाचे आरोप कारणीभूत आहेत. त्यावर आता आंतर राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. अशा वेळी आता पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची लोकप्रियता घटत चालली असल्याचे समोर आले आहे.
कॅनडाच्या (Canada) नागरिकांना त्यांच्या पसंतीचा पंतप्रधान कोण असा प्रश्न एका सर्वेक्षणानुसार विचारण्यात आला. तर त्यात ट्रुडो यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले. कॅनडास्थित न्यूज प्लॅटफॉर्म ग्लोबल न्यूजसाठी केलेल्या नवीन सर्वेक्षणानुसार, विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे हे 40 टक्के कॅनेडियन लोकांच्या पसंतीचे पंतप्रधान आहेत आणि जस्टिन ट्रूडो त्यांच्या मागे आहेत. 2025 मध्ये पुढील निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी कंझर्वेटिव्हना बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
खलिस्तान समर्थक NDP नेते जगमीत सिंग यांच्या पसंतीत घसरण दिसून येत आहे. एनडीपी नेते जगमीत सिंग, जे खलिस्तान समर्थक आहेत आणि पीएम ट्रूडो यांचे सहयोगी आहेत, ते सप्टेंबर 2022 पासून चार टक्क्यांनी घसरले आहेत. केवळ 22 टक्केच कॅनडियन नागरिकांनाच वाटते की सरकारचे नेतृत्व करण्यासाठी ते सर्वोत्तम पर्याय आहेत.
Join Our WhatsApp Community