- ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा टी-२० सामना भारताने गमावला. पण, या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने एक महत्त्वाची कामगिरी बजावली. विंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना भारताने थोडक्यात गमावला. पण, या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने एक वैयक्तिक मानाचा टप्पा पार केला. टी-२० प्रकारात त्याने जसप्रीत बुमरा आणि रवीचंद्रन अश्विन या भारताच्या आघाडीच्या गोलंदाजांना मागे टाकलं.
या सामन्यापूर्वी हार्दिक आणि जसप्रीत यांचे समसमान ७० बळी होते. पण, गयाना इथं झालेल्या सामन्यात हार्दिकने तीन बळी मिळवले. आणि ते करताना त्याने जसप्रीत बरोबरच अश्विनलाही मागे टाकले. अश्विनने ६५ सामन्यात ७२ टी-२० बळी मिळवले होते.
हार्दिक पांड्या आतापर्यंत या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रविवारी त्याने ब्रँडन किंग (०), जॉनसन चार्ल्स (२) आणि रोमन पॉवेल (२१) यांना बाद केलं. भारतीय गोलंदाजांमध्ये यजुवेंद्र चहल हा फिरकी गोलंदाज ९५ बळींसह आघाडीवर आहे. तर त्याच्या खालोखाल भुवनेश्वर कुमारने ९० बळी टिपले आहेत. हार्दिक आता ७३ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
(हेही वाचा – Meri Mati, Mera Desh : ‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …)
जागतिक स्तरावर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन १४० बळींसह अव्वल क्रमांकावर आहे. हसन ११७ टी-२० सामने खेळला आहे. जसप्रीत बुमरा गेल्यावर्षी सप्टेंबरपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच त्याच्यावर न्यूझीलंडमध्ये एक शस्त्रक्रियाही पार पडली. त्यानंतर आता आयर्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेमधून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आयरिश दौऱ्यातील तीन सामने १८ ऑगस्टपासून डब्लिन इथं होणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community