Carlos Alcaraz : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझला खुणावतंय नंबर वन पद आणि जोकोविचला हरवण्याचं स्वप्न

टेनिसमधील युवा स्टार कार्लोस अल्काराझ ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हानासाठी तयार झाला आहे. 

180
Carlos Alcaraz : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझला खुणावतंय नंबर वन पद आणि जोकोविचला हरवण्याचं स्वप्न
Carlos Alcaraz : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझला खुणावतंय नंबर वन पद आणि जोकोविचला हरवण्याचं स्वप्न
  • ऋजुता लुकतुके

नवी टेनिस स्टार कार्लोस अल्काराझला (Carlos Alcaraz) नवीन वर्षात अनेक महत्त्वाच्या गोष्टी खुणावत आहेत. नवीन हंगामात पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळताना त्याला आव्हान असेल ते नंबर वन नोवाक जोकोविचचं (Novak Djokovic). आणि अल्काराझला जोकोविचला हरवून नंबर वन होण्याची संधी आहे. शिवाय आपल्या तिसऱ्या ग्रँडस्लॅम विजयाचं स्वप्नही त्याने पाहिलंय. नवीन वर्षांत ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या त्याला वाढवायची आहे. (Carlos Alcaraz)

२० वर्षं अल्काराझसाठी (Carlos Alcaraz) गेल्यावर्षीची सुरुवात चांगली झाली नव्हती. डिसेंबर २०२१ मध्ये तो दुखापतग्रस्त झाला. आणि त्याला वर्षातील पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला. आणि नंबर वनही झाला. (Carlos Alcaraz)

कार्लोससाठी २०२३ वर्षं तसं अनियमिततेनं भरलेलंच होतं. पण, आता नवीन हंगामात मागचं काही त्याला आठवायचं नाही. आणि गेल्यावर्षी जे जमलं नाही, ते करून दाखवायचं आहे. २०२२ ची अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून अल्काराझने (Carlos Alcaraz) टेनिस विश्वात पहिल्यांदा खळबळ उडवून दिली होती. सगळ्यात कमी वयात त्याने नंबर वन क्रमांकही पटकावला. पुढे २०२३ ची विम्बल्डन जिंकून त्याने पहिलं विजेतेपद हे नशीब नव्हतं हे सिद्ध केलं. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्याने नोवान जोकोविचला पाच सेटमध्ये पराभूत केलं होतं. (Carlos Alcaraz)

(हेही वाचा – IPL in India? आयपीएलचा हा हंगाम पूर्णपणे भारतातच घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न)

पण, सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा दुखापतीमुळे तो टेनिस बाहेर गेला. आणि पुन्हा परतला तेव्हा एटीपी हंगामातील शेवटच्या स्पर्धेत जोकोविचने अंतिम फेरीत त्याला हरवलं. ८ व्यांदा एटीपी अंतिम फेरी जिंकण्याबरोबरच वर्षाचा शेवट अव्वल स्थानावरून करण्यातही जोकोविच यशस्वी झाला. (Carlos Alcaraz)

पण, आता अल्काराझ (Carlos Alcaraz) दुखापतीतून सावरलाय. आणि गेल्यावर्षी हुकलेली संधी पुन्हा मिळवायला तो सज्ज झालाय. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत नोवाक जोकोविच विरुद्ध कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) असं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. (Carlos Alcaraz)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.