- ऋजुता लुकतुके
गेल्या महिन्यात टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. बक्षिसाची ही रक्कम पाहून १९८३ च्या एकदविसीय विश्वचषक विजेत्या संघातील एका सदस्यानेही अशाच प्रकारच्या बक्षिसाची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ चा विश्वचषक लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर जिंकला होता. (Cash Prize to 1983 WC Winners ?)
१९८३ च्या जून महिन्यात भारताचा अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजशी मुकाबला होता. ६० षटकांच्या त्या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या. त्यानंतर विवियन रिचर्ड्स असलेल्या विंडिज संघाला त्यांनी १४० धावांत गुंडाळलं. ४३ धावांनी निर्णायक विजय मिळवला. मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पहिल्यांदा चमकलं. त्यामुळेच आता या संघातील एका खेळाडूने आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयकडून रोख रकमेची मागणी केली आहे. या खेळाडूने आपलं नाव मात्र उघड होऊ दिलेलं नाही. (Cash Prize to 1983 WC Winners ?)
(हेही वाचा – Mumbai Rain : लोकल पकडताना तिचा पाय घसरला, अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण…)
तेव्हाच्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंना देण्यात आले होते इतके रुपये
‘१२५ कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. आताच्या संघाला एवढे पैसे मिळतायत याचा मला आनंदच आहे. पण, आम्ही विश्वचषक जिंकला, तेव्हा आम्हाला काहीच मिळालं नव्हतं. तेव्हा बीसीसीआयचं म्हणणं होतं की, त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण, आता तर आहेत. मग आता ते का देत नाहीत? १९८३ च्या संघातील काही खेळाडू सुस्थितीत आहेत. पण, काही असे आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत. मग आता बीसीसीआयने त्या खेळाडूंचाही गौरव केला तर काय बिघडलं?’ असा सवाल या खेळाडूने विचारला आहे. (Cash Prize to 1983 WC Winners ?)
तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला २५,००० रुपये दिले होते. खेळाडूंची ही आर्थिक फरपट पाहून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यावेळी पुढाकार घेऊन नवी दिल्लीत एक संगीतरजनी आयोजित केली होती. त्यातून मिळालेले पैसे त्या क्रिकेटपटूंना देणार होत्या. या कार्यक्रमातून उभे राहिलेले १,००,००० रुपये तेव्हाच्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंना देण्यात आले होते. (Cash Prize to 1983 WC Winners ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community