क्रिकेट बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘या’ खेळाडूवर कारवाई; १ वर्ष निलंबन, भरावा लागणार लाखोंचा दंड

क्रिकेट बोर्डाकडून खेळाडू हे करारबद्ध असतात. या करारातील नियमांचे पालन करणे सर्व क्रिकेटपटूंसाठी बंधनकारक असते. जरी एखाद्या खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर सदर खेळाडूला क्रिकेट बोर्ड शिक्षा सुद्धा करू शकते. काही प्रकरणांमध्ये खेळाडूवर एक वर्षाची बंदी घातली जाते.

( हेही वाचा : निसर्गरम्य अलिबागला जाता येणार फक्त सव्वा तासात! प्रवाशांना मिळतील भन्नाट सुविधा; किती असणार भाडे? )

एक वर्षासाठी निलंबन

श्रीलंकेचा अष्टपैलू फलंदाज चमिका करुणारत्नेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या २६ वर्षीय चमिका करुणारत्नेवर टी-२० विश्वचषकादरम्यान करारातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. चमिका करुणारत्नेवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली असून पुन्हा असे न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तीन सदस्यीय समितीने केलेल्या शिस्तभंगाच्या चौकशीनंतर एसएलसीच्या कार्यकारी समितीने ही शिक्षा सुनावली आहे. याशिवाय करुणारत्नेवर ५० हजार अमेरिकन डॉलरचा (४.०८ लाख) दंडही ठोठावण्यात आला आहे. संबंधित क्रिकेटपटूने सुद्धा त्याच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने लावलेले सर्व आरोप मान्य केले आहेत.

श्रीलंकेच्या आणखी एका खेळाडूवर गंभीर आरोप

श्रीलंकेचा क्रिकेटपटू धनुष्का गुनाथलिका याच्यावर सुद्धा टी२० विश्वचषक दरम्यान एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. आता गुनाथलिकाला जामीन मिळाला असून त्याच्यावर टिंडर App वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here