- ऋजुता लुकतुके
दीड महिन्याचं अखंड क्रिकेट आणि मग तीन दिवस बेरिल चक्रीवादळामुळे देशापासून दूरावलेला क्रिकेट संघ गुरुवारी पहाटे सव्हा सहा वाजता नवी दिल्लीत परतला. आणि खेळाडूंचा पहिला मुक्काम काही तास दिल्लीतून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. रोहित (Rohit), सूर्यकुमार (Suryakumar), हार्दिक (Hardik) आणि यशस्वी (Yashasvi) यांनी हॉटेल बाहेर ढोल पथकाच्या तालावर नाचही केला. आणि आत गेल्यावर खेळाडूंसाठी हॉटेल प्रशासनाने खेळाडूंच्या राज्यांतील खास पदार्थ तयार ठेवत त्यांचं स्वागत केलं. (Champions Come Home)
(हेही वाचा- Rohit Sharma : मुंबईत ओपन – एअर बसमधील मिरवणुकीपूर्वी कर्णधार रोहितची ‘ही’ कृती उपस्थितांचं मन जिंकून गेली)
दिल्लीच्या विराट कोहलीसाठी तयार होते छोले – भटुरे, तर विराट (Virat), यशस्वी (Yashasvi), शिवम आणि सूर्यकुमारने (Suryakumar) वडापाववर ताव मारला. खेळाडूंच्या खोलीत चॉकलेटचे बॅट, बॉल आणि स्टंप ठेवण्यात आले होते. तर खेळाडूंच्या स्वागतासाठी तीन रंगातील तीन लेअरचा एक केकही तयार ठेवण्यात आला होता. (Champions Come Home)
Welcome cake for India Cricket Team at hotel ITC Maurya after winning World Cup😍❤️ pic.twitter.com/UC0lfkHono
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) July 4, 2024
‘आम्ही भारतीय संघाच्या जर्सीचे तीन रंग – निळा, नारिंगी आणि पांढरा रंग केकमध्ये वापरला आहे. त्यावर बीसीसीआयचा लोगो आणि संघाच्या सर्व विजयांच्या यादगार आठवणींचे फोटो आहेत. सगळ्यात वर टी-२० विश्वचषकाचा चषकही आहे,’ असं आयटीसी मौर्य हॉटेलचे मुख्य शेफ एएनआयशी बोलताना म्हणाले. (Champions Come Home)
खेळाडूंच्या आवडीप्रमाणे नानकटाई बिस्किटं तसंच इतर पदार्थही ठेवण्यात आले होते. विराटने (Virat) अपेक्षेप्रमाणे अमृतसरी छोले – भटुरेवर ताव मारला. तर रोहितचा (Rohit) हातही नकळत वडा पावकडे गेला. रोहितबरोबर सूर्यकुमारही (Suryakumar) होता. तर शिवन (Shivam) दुबेही पाठोपाट तिकडेच गेला. (Champions Come Home)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community