- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकातील विजयानंतर गुरुवारी मायदेशी परतला. सकाळी दोन – अडीच तास पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर (PM Narendra Modi) संघाने गप्पाही मारल्या. काल या समारंभाचे फक्त फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. पण, शुक्रवारी पंतप्रधान कार्यालय आणि एएनआय वृत्तसंस्थेनं पंतप्रधान आणि खेळाडूंमध्ये झालेल्या चर्चेचा व्हीडिओ आता प्रसिद्ध केला आहे. यात रोहितला पंतप्रधानांनी त्याच्या विजयी नृत्याविषयी विचारलं. (Champions Return Home)
(हेही वाचा- Hardik Pandya to PM Narendra Modi : ‘मागचे सहा महिने मनोरंजनाचे होते,’ असं हार्दिक पंतप्रधानांना का म्हणाला?)
रोहित (Rohit) चषक स्वीकारण्यासाठी मंचावर गेला तोच एक विशिष्ट नृत्याची स्टेप करत. त्याविषयी पंतप्रधानांना कुतुहल होतं. तसंच स्पर्धा जिंकल्यावर रोहितने खेळपट्टीवरील माती चाखली होती. तिची चव कशी होती, असंही पंतप्रधानांनी विचारलं. (Champions Return Home)
#WATCH | During his interaction with PM Modi, Team India captain Rohit Sharma said, “…we all had waited a lot for this, worked very hard for this. Many times we came very close to winning the World Cup, but we could not move forward, but this time because of everyone we were… pic.twitter.com/h6uwlOaLnC
— ANI (@ANI) July 5, 2024
‘सर, तो असा प्रसंग होता, ज्याची आम्ही कितीतरी काळ वाट पाहात होतो. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनीच मला सांगितलं होतं, नुसता चालत जाऊ नको. काहीतरी वेगळं कर. मी त्यांचं म्हणणं मान्य केलं,’ असं रोहित (Rohit) म्हणाला. यावर पंतप्रधानांनी, ‘ही चहलची कल्पना होती का?’ असंही विचारलं. रोहितने हसत हसत, ‘चहल आणि कुलदीप दोघांचीही,’ असं उत्तर दिलं. (Champions Return Home)
खेळपट्टीवरील गवत आणि माती चाखण्याच्या कृतीचंही रोहीतने स्पष्टीकरण दिलं. ‘मला तिथली काहीतरी घट्ट आठवण हवी होती. तिथे आम्ही जिंकलो होते. मला तिथलं काहीतरी माझ्यात सामावलेलं, माझ्याबरोबर हवं होतं,’ असं रोहित म्हणाला. (Champions Return Home)
पंतप्रधानांनी विराटलाही (Virat) अंतिम फेरीतील विजयी कामगिरीविषयी विचारलं. तेव्हा विराटने त्यांना क्रिकेट तुमचं गर्वहरण करतं, असं उत्तर दिलं. (Champions Return Home)
Aapka ahankar upar aa jata hai
To khel aapse dur chala hata hai
– It takes guts to admit such things pic.twitter.com/MV7jfePQf4— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 5, 2024
‘अहंकार वाढला की, खेळ आपल्यापासून दूर जातो. मी हे करेन, असं करून दाखवेन, अशा गोष्टी सतत माझ्या मनात यायच्या. असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तो तुमचा अहंकार असतो. मला अंतिम सामन्यात तो सोडायची गरज होती. मी परिस्थितीनुरुप खेळायचं ठरवलं. आणि अखेर मला ते जमलं,’ असं विराट पंतप्रधानांशी बोलताना म्हणाला. (Champions Return Home)
जेव्हा खेळाला मी आदर दिला, तेव्हा खेळानेही माझा सन्मान केला, असं विराट म्हणाला. (Champions Return Home)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community