Champions Return Home : भारतीय खेळाडूंना बघायला जेव्हा एक चाहता झाडावर चढला….

Champions Return Home : झाडावर चढलेल्या चाहत्याला बघून विराट आणि रोहीतलाही हसू आवरलं नाही 

94
Champions Return Home : भारतीय खेळाडूंना बघायला जेव्हा एक चाहता झाडावर चढला….
Champions Return Home : भारतीय खेळाडूंना बघायला जेव्हा एक चाहता झाडावर चढला….

ऋजुता लुकतुके 

मुंबईत भारतीय संघाची विजय यात्रा काढण्यात आली तेव्हा क्षणभर मुंबई पण थांबली. कारण, गर्दी इतकी होती की, पुढे जायला जागाही उरली नाही. मुंबईची रेल्वे स्थानकं भरून गेली होती. रस्ते ओसंडून वाहत होते. फक्त मुंबईकरांनीच नाही तर देशभरातून या सोहळ्यासाठी लोक मुंबईत एका दिवसासाठी आले होते. सगळ्यांना टी-२० जगज्जेत्यांची आणि खासकरून विराट आणि रोहीतची एक झलक बघायची होती. (Champions Return Home)

(हेही वाचा- Champions Come Home : दीड महिन्यांनी मायदेशात परतल्यावर खेळाडूंनी कशावर ताव मारला?)

खुल्या बसमधून भारतीय संघाची मिरवणूक निघाली असताना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माचं (Rohit Sharma) एका खास चाहत्याने लक्ष वेधलं. हा चाहता भारतीय खेळाडूंचा फोटो काढण्यासाठी चक्क जवळच्या एका झाडावर चढला होता. तिथून आयफोनवर फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. विराटचं आधी त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने रोहितला बोलावून हा चाहता दाखवला. (Champions Return Home)

 मुंबईच्या रस्त्यांवर ‘वंदे मातरम’ किंवा ‘इंडिया, इंडिया’ अशा घोषणा सुरू होत्या. चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वाहतूक पोलिसांनी मरिन लाईन्सकडे येऊ नका अशा सूचना लोकांना द्यायला सुरुवात केली. कारण, तिथे आधीच लाखो लोक हजर होते. वाहतूक पूर्णपणे अडली होती. मरिन ड्राईव्ह ते चर्चगेट रस्ता मिरवणुकीचा रस्ता असल्याने तिथे वाहतूक बंद होती. त्याचा परिणाम दक्षिण मुंबईतील इतर रस्त्यांवर झाला. (Champions Return Home)

(हेही वाचा- Pune Porsche Accident : अखेर ‘त्या’ बाळाने लिहिला 300 शब्दांचा निबंध)

भारतीय संघाची मिरवणूक वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) संपली. तिथे पाऊस असतानाही चाहते हाऊसफुल्ल गर्दी करून जमले होते. भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रुममधून प्रवेश केला. विराट कोहली (Virat Kohli) खेळाडूंमध्ये सगळ्यात पुढे होता. त्याच्या हातात विश्वचषक होता. त्याच्या मागून सर्व खेळाडूंनी मैदानाला एक फेरी मारून चाहत्यांचं अभिनंदन स्वीकारलं. (Champions Return Home)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.