Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघासाठी यंदा बसमधून मिरवणूक का नाही?

खेळाडू वेगवेगळ्या वेळी दुबईतून भारतात परतत आहेत.

74
Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघासाठी यंदा बसमधून मिरवणूक का नाही?
Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघासाठी यंदा बसमधून मिरवणूक का नाही?
  • ऋजुता लुकतुके

रविवारी चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) जिंकल्यानंतर भारतीय संघ लगेचच सोमवारी मायदेशी परतला आहे. पण, खेळाडू वेगवेगळ्या विमानांनी आपापल्या शहरांत परतले आहेत. तर काहींनी कुटुंबीयांबरोबर छोटी सुटी परदेशात घालवणं पसंत केलं आहे. पण, खेळाडू एकत्र येऊन बीसीसीआयच्या मुख्यालयात मुंबईत मात्र आले नाहीत. त्यामुळे खेळाडूंसाठी यंदा एकत्र सन्मानसोहळा होणार नाही का? किंवा नेहमीसारखी बसमधून खेळाडूंची मिरवणूकही निघणार नाही का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, बीसीसीआयने (BCCI) जाणीवपूर्वक तसा सोहळा टाळला आहे. २२ मार्चला आयपीएल लीग सुरू होणार असल्यामुळे खेळाडूंना थोडी विश्रांती मिळावी, असा हेतू त्यामागे आहे. (Champions Return)

(हेही वाचा – Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेता कर्णधार रोहित शर्माचं मुंबईत जोरदार स्वागत)

आपापल्या घरी थोडे दिवस घालवून खेळाडू लगेचच त्यांच्या आयपीएल (IPL) फ्रँचाईजीत दाखल होणार आहेत. भारतीय संघाने खरंतर १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स करंडकावर (Champions Trophy) नाव कोरलं आहे. पण, ही स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खूपच कमी दिवस असल्यामुळे बीसीसीआयने असा कुठलाही कार्यक्रम आयोजित करणं टाळलं आहे. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करत ६ बाद २५१ धावा केल्या होत्या. आणि त्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजय मिळवला. रोहित शर्माने (Rohit Sharma) ७६, श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ४८ तर के एल राहुलने (KL Rahul) नाबाद ३४ धावा केल्या. (Champions Return)

(हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण; Ajit Pawar यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा)

आता चॅम्पियन्स करंडकानंतर (Champions Trophy) लगेचच टी-२० लीग सुरू होणार आहे. काही फ्रँचाईजींनी तर आपलं हंगामपूर्व सराव शिबीर सुरूही केलं आहे. मुंबई इंडियन्सनी वानखेडे स्टेडिअमवर सराव सुरू केला आहे. तर सनरायझर्स हैद्राबाद संघही यांनीही १ तारखेपासूनच सराव सुरू केला आहे. या दोन्ही फ्रँचाईजीत मिळून रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे खेळाडू आहेत. (Champions Return)

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) नवी दिल्लीत दाखल झाला आहे. तो लवकरच कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात मार्गदर्शक म्हणून सामील होणार आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने जिंकलेली ही पहिली मोठी स्पर्धा आहे. (Champions Return)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.