Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार

Champions Trophy 2024 : हायब्रीड मॉडेलसाठी तयार होतानाच पाकिस्तानने आयसीसीसमोर बऱ्याच अटी ठेवल्या आहेत 

67
Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार
Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी चॅम्पियन्स करंडकाविषयी गेले वर्षभर सुरू असलेली अनिश्चितता आणि भारत, पाकिस्तान आणि आयसीसी यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटी अखेर संपुष्टात आल्या आहेत. चॅम्पियन्स करंडक हायब्रीड पद्धतीने घेण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळ तयार झालं आहे. भारताचे सामने संयुक्त अरब अमिरातीत होतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. पण, या बदलासाठी पाकिस्ताननेही आयसीसीसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यावर वाटाघाटी अजूनही सुरूच आहेत. (Champions Trophy 2024)

शुक्रवारी आयसीसीने आयोजित केलेल्या सदस्य देशांच्या बैठकीत निर्णय अपेक्षित होता. पण, तो झाला नाही. त्यानंतर पाक बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच घेणार असाच हेका मीडियाशी बोलताना कायम ठेवला होता. पण, आयसीसी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. स्पर्धाच पाकिस्तानबाहेर हलवण्यावर चर्चा सुरू झाल्यावर पाकिस्तानने नरमाईची भूमिकी घेतल्याचं दिसत आहे. आधीच्या विधानानंतर दोनच दिवसांत मोहसीन नकवी यांनी मीडियाशीच बोलताना, ‘क्रिकेट जिंकलं पाहिजे, खेळाचं हित महत्त्वाचं,’ असं विधान केलं होतं. तेव्हाच पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार असल्याचं स्पष्ट झालं. (Champions Trophy 2024)

(हेही वाचा- World Computer Literacy Day : जागतिक संगणक साक्षरता दिन का साजरा केला जातो?)

अर्थात, पाकिस्तानने त्यासाठी आयसीसीसमोर काही जाचक वाटणाऱ्या अटीही ठेवल्या आहेत. त्यांनी आयसीसीच्या नफ्यातील प्रत्येक सदस्य देशाला मिळणाऱ्या वाट्यात अतिरिक्त हिस्सा मागितला आहे. शिवाय जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसेल तर इथून पुढे पाकिस्तानी संघही भारतात जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इथून पुढे भारतात एखादी स्पर्धा होणार असेल तर ती भारतालाही हायब्रीड पद्धतीने घ्यावी लागेल, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. या अटींवर भारताकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (Champions Trophy 2024)

कारण, भारतात २०३१ पर्यंतच्या क्रिकेट कॅलेंडरनुसार, ३ महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा होणार आहेत. २०२६ चा टी-२० विश्वचषक, २०३१ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२९ चा चॅम्पियन्स करंडक अशा या तीन स्पर्धा आहेत. शिवाय महिलांची टी-२० स्पर्धाही भारतात होणार आहे. यातील विश्वचषक स्पर्धांसाठी भारताबरोबर श्रीलंका आणि बांगलादेश असे दोन संयुक्त यजमान आहेत. पण, २०१९ चा चॅम्पियन्स करंडक फक्त भारतातच होणार आहे. अशावेळी भारतीय संघ या स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलला तयार झाला तर पाकिस्तानच्या अटी मान्य होऊ शकतील. ती कोंडी अजून बाकी आहे. (Champions Trophy 2024)

(हेही वाचा- Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन)

पाकिस्तानची हायब्रीड मॉडेलला असलेली हरकत संपल्यानंतर आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धा मार्गी लागणार आहे. येत्या काही आठवड्यात स्पर्धेचं नवीन वेळापत्रकही जाहीर होऊ शकेल. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण, भारतीय संघाने पाकिस्तानला जायला नकार दिल्यामुळे मधल्या काळात गोंधळ उडाला होता. (Champions Trophy 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.