Champions Trophy 2025 : खराब फलंदाजीनंतर आता KL Rahul च्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह !

66
Champions Trophy 2025 : खराब फलंदाजीनंतर आता KL Rahul च्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह !
Champions Trophy 2025 : खराब फलंदाजीनंतर आता KL Rahul च्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह !

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) चा १२ वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आणि त्यांनी सात षटकांत ३० धावांत तीन विकेट गमावल्या पण अय्यर आणि अक्षर यांनी संयमाने खेळ केला आणि संघाला पुनरागमन करण्यास मदत केली. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी १३६ चेंडूत ९८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. (KL Rahul)

हेही वाचा-आयपीएलवर बहिष्कार टाका, पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू Inzamam-ul-Haq ने गरळ ओकली

तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 45.3 षटकांत 205 धावांवर आटोपला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा सामना 44 धावांनी जिंकला. भारताकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने 10 षटकांत 42 धावांत 5 फलंदाज बाद केले. कुलदीप यादवला 2 यश मिळाले. तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली. (Champions Trophy 2025)

न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलने एकामागून एक चुका केल्या…
यादरम्यान यष्टीरक्षक केएल राहुल याची निराशाजनक कामगिरी दिसली. फलंदाज केएल राहुल २९ चेंडूत २३ धावा करून मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रत्युत्तरात विल्यम्सनने डाव एका बाजूने भक्कमपणे सांभाळला होता. यावेळी विल्यम्सन बाद होणे टीम इंडियासाठी महत्त्वाचे होते. न्यूझीलंडविरुद्ध केन विल्यमसनचा कॅच सोडणारा केएल राहुल हा पहिला खेळाडू होता. त्यावेळी केन विल्यमसन फक्त १ धाव काढल्यानंतर खेळत होता. यानंतर, केन विल्यमसन ८१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. न्यूझीलंडच्या डावाच्या २६ व्या षटकात केएल राहुलने पुन्हा एक मोठी चूक केली. कुलदीप यादवच्या चेंडूची धार टॉम लॅथमच्या बॅटने घेतली पण केएल राहुलला झेल घेता आला नाही. न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलने अनेक चुका केल्या. (Champions Trophy 2025)

केएल राहुल की ऋषभ पंत ?
केएल राहुलच्या चुकांमुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या आहेत. या स्पर्धेसाठी केएल राहुलची पहिली पसंती विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली. तर रिषभ पंतला (Rishabh Pant) बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. आता प्रश्न असा आहे की, भारतीय संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केएल राहुलला मैदानात उतरवणार की ऋषभ पंतला मैदानात उतरवणार? (Champions Trophy 2025)

यापूर्वीही टीम इंडियाच्या पाकिस्तान आणि बांग्लादेश विरूध्दच्या सामन्यात केएल राहुलची खराब कामगिरी दिसून आली. यष्टीरक्षण करताना केएल राहुलने अनेक झेल सोडले आहेत. यामुळे चाहत्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात कर्णधार आणि संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतात हे पाहणे मनोरंजक असेल. (Champions Trophy 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.