Champions Trophy 2025 : दुबईत गंभीर आणि आगरकर यांच्यात मैदानातच रंगला वाद?

Champions Trophy 2025 : रविवारी दुबईत सरावादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसलं.

84
Champions Trophy 2025 : दुबईत गंभीर आणि आगरकर यांच्यात मैदानातच रंगला वाद?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने इंग्लंडिवरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकून चॅम्पियन्स करंडकापूर्वी आपला फॉर्म दाखवून दिला आहे. तर रोहित आणि विराटनेही या मालिकेत धावा केल्या आहेत. आघाडीची फळी जमून आलेली असताना भारताच्या मधल्या फळीने मात्र अलीकडे सातत्याने धावा केलेल्या नाहीत आणि त्याची चिंता स्पर्धेपूर्वी माजी खेळाडू आणि जाणकारांनी बोलून दाखवली आहे. फक्त इतकंच नाही तर दुबईत संघाचा सराव सुरू असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचंही संघाच्या निवडीवर एकमत होताना दिसत नाहीए. (Champions Trophy 2025)

वादाचा मुद्दा आहे तो मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांना खेळवण्याचा. दुबईत खेळाडूंचा सराव सुरू असताना मैदानाच्या मध्यावर कर्णधार रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि इतर प्रशिक्षकांची अर्ध्या तासाच्या वर जोरदार चर्चा सुरू होती आणि त्यातही गप्पांपेक्षा वादच झडताना दिसत होते. आघाडीच्या फळीत रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट खेळणार हे नक्की आहे. इंग्लंडविरुद्ध श्रेयस अय्यर नियमितपणे चौथ्या क्रमांकावर खेळला. पण, त्यानंतर ना क्रम ठरलेला आहे, ना खेळाडू आणि याच गोष्टीकडे तसंच गंभीर आणि आगरकर यांच्या विसंवादाकडे जाणकारांनी बोट दाखवलं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना साडेदहा लाखांमध्ये मालकी हक्काचे घर… तेही मुंबईत!)

चॅम्पियन्स करंडकासाठी संघ निवड जाहीर करताना आगरकर स्पष्टपणे म्हणाले होते की, रिषभ पंत संघाचा यष्टीरक्षक म्हणून पहिला पर्याय आहे. तर इंग्लंडविरुद्धची मालिका संपली, तेव्हा गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘रिषभ संघात असेल तर तोच पहिला पर्याय असेल. पण, एरवी पहिला पर्याय के. एल. राहुलचा आहे.’ म्हणजेच गंभीर रिषभला एकदिवसीय संघात खेळवण्याच्या मताचा सध्या नाहीए. (Champions Trophy 2025)

श्रेयस अय्यरवरूनही दोघांमध्ये वाद आहेत. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही श्रेयसची संघात जागा पक्की नव्हती. त्याने तसं स्वत; मुलाखतीत सांगितलं आहे. सामन्याच्या आदल्या रात्री कर्णधार रोहितने फोन करून त्याला विराटच्या दुखापतीविषयी सांगितलं आणि त्यामुळे तो सामन्यासाठी तयार झाला. म्हणजेच, श्रेयस अंतिम अकरा जणांमध्ये सुरुवातीला नव्हता. या गोष्टीवरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सध्या श्रेयसने तीनही सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करून हा प्रश्न मिटवला आहे. पण, संघात खेळाडूंची निवड नेमकी कशाच्या निकषावर होते हा प्रश्न आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Millets tablet : भरडधान्यापासून बनवली भुकेची गोळी ; लष्कराला होणार मोठी मदत)

इंग्लंडविरुद्ध अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक आणि के. एल. राहुलच्या वर पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला आला. त्याचा तोच क्रमांक असणार आहे का? अक्षरला तरी त्याच्या क्रमाची आणि पर्यायाने जबाबदारीची माहिती आहे का, हा प्रश्न आहे. म्हणूनच मधल्या फळीतील फलंदाजाचा क्रम ठरलेला असेल तर त्यांना आपल्यावरील जबाबदारीची कल्पना येते आणि नेमकं तेच आता होताना दिसत नाही. ना अंतिम अकरामध्ये कोण खेळणार हे ठरलेलं आहे, ना फलंदाजीचा क्रमांक ठरलेला आहे. संघ प्रशासनाकडून त्याविषयी गोंधळात पाडणारी उत्तरं येत आहेत. गोलंदाजीतही तेज गोलंदाजांचा वापर आणि ५ फिरकीपटूंपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार यात मतमतांतरं आहेत. अशावेळी भारतीय संघ येत्या २० तारखेला बांगलादेश विरुद्ध आपली चॅम्पियन्स करंडकाची मोहीम सुरू करत आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.