चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या (Champions Trophy 2025) उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये ४ मार्च रोजी खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी करो वा मरो अशी स्थिती आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ २६४ धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड ३९ धावा, स्टिव्ह स्मिथने ७३ धावा तर अॅलेक्स कॅरीने ६१ धावांची मोठी खेळी केली. तर भारताकडून शमीने ३ विकेट्स, वरूण आणि जडेजाने २-२ विकेट्स तर हार्दिक व रवींद्र जडेजाने १-१ विकेट घेतली आहे. शमीच्या ४९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नॅथन एलिस षटकार मारून विराट करवी झेलबाद झाला. तर अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झाम्पा क्लीन बोल्ड झाला. यासह भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत आटोपला आहे. हार्दिक पंड्याच्या ४८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अॅलेक्स कॅरी एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट थ्रो समोर धावबाद झाला आहे. अॅलेक्स कॅरीने ४८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. (Champions Trophy 2025)
Join Our WhatsApp Community