-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकासाठीच्या (Champions Trophy 2025) भारतीय संघाच्या जर्सीवरून निर्माण झालेला वाद आता मिटला आहे. या बाबतीत आयसीसीने स्पर्धेच्या नियमांचं पालन सगळ्यांना करावंच लागेल असा कौल दिल्याचं समजतंय. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devajit Saikia) यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकबझशी बोलताना, ‘आयसीसीकडून येणाऱ्या निर्णयाचं पालन करू,’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता आयसीसी स्पर्धेचा नियम म्हणून स्पर्धेच्या आयोजकांचं नाव हे स्पर्धेपुढे लिहावंच लागतं.
‘स्पर्धेच्या लोगोबरोबरच यजमान देशाचं नाव जोडणं हे अनिवार्य आणि नियमाला धरूनच आहे,’असं आयसीसीच्या (ICC) एका पदाधिकाऱ्याने ए स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. स्पर्धेच्या आयोजकांचं नाव लिहिलेलं नसेल तर त्या संघावर कारवाई होऊ शकते.
(हेही वाचा – Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन)
🚨 THE BCCI AGREES TO HAVE PAKISTAN ON CT JERSEY. 🚨
– BCCI Secretary confirms the BCCI will follow every uniform related ICC rule during the Champions Trophy. (PTI). pic.twitter.com/X2Yx9RrhTW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 22, 2025
या आधी बातमी पसरली होती की, भारतीय संघाने जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्याला विरोध केला होता. आपले सामने दुबईत होत असल्यामुळे ते नाव जर्सीवर असावं अशी भारतीय संघाची मागणी होती. पण, पाकिस्तान हाच चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy 2025) मुख्य आयोजक देश असल्याचा निर्वाळा आयसीसीने (ICC) दिल्याचं समजतंय. त्यामुळे जर्सीवरून सुरू झालेला वाद आता निकालात निघाल्याचं दिसतंय.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधारांच्या संमेलनात भाग घेण्याच्या बाबतीत मात्र अजूनही बीसीसीआयने अजून माघार घेतलेली नाही. चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy 2025) एक दिवस आधी सहभागी ८ संघांचे कर्णधार एकत्र फोटोशूट करतात. आणि त्यांची पत्रकार परिषदही होते. हा कार्यक्रम उद्घाटनाचा सामना होणार असलेल्या गद्दाफी स्टेडिअमवर होणार आहे. पण, या कार्यक्रमाला रोहित शर्मा जाणार नाहीए.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community