Champions Trophy 2025 : …तर भारतीय खेळाडूंची पत्नी चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला जाऊ शकते!

Champions Trophy 2025 : बीसीसीआयने खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेत मोठा बदल केला आहे.

48
Champions Trophy 2025 : …तर भारतीय खेळाडूंची पत्नी चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला जाऊ शकते!
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघातील लग्न झालेल्या खेळाडूंना एक मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआयने आणलेल्या आचारसंहितेत पहिल्याच परदेश दौऱ्यात खेळाडूंना सूट मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे बीसीसीआयने निदान प्रवासाविषयीच्या कलमातून यु-टर्न घेतल्याचं दिसत आहे. दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयने आता खेळाडूंना पत्नी आणि कुटुंबीयांना दुबईला नेण्याची परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी अट घालण्यात आली आहे. अटींनी पूर्तता झाली तर बीसीसीआयचं स्वखर्चाने कुटुंबीयांना दुबईला नेण्या-आणण्याचा खर्च करेल. (Champions Trophy 2025)

या आधीच्या नियमांनुसार, परदेश दौरा ४५ दिवसांचा असेल तर २ आठवडे आणि ३० दिवसांचा असेल तर फक्त एक आठवडा खेळाडूंना कुटुंबीयांना बरोबर ठेवता येणार होतं. आता चॅम्पियन्स करंडक १५ दिवसांचा असताना खेळाडूंना कुटुंबीयांना दुबईला आणता येणार आहे. पण, आता स्पर्धेतील एका सामन्यासाठी कुटुंबीयांना बरोबर ठेवण्याची परवानगी बीसीसीआयने दिल्याचं समजतंय. बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने दैनिक जागरणने ही बातमी दिली आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघाची चॅम्पियन्स करंडकाची जर्सी आली समोर)

बीसीसीआयच्या आचारसंहितेच्या विरोधात जाऊन खेळाडूला विशेष परवानगी हवी असल्यास त्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेण्याचा दंडक बीसीसीआयने ठरवला होता. आता त्यांनी एकाच सामन्यासाठी कुटुंबीयांबरोबर राहण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी बीसीसीआयने आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी खेळाडूंवर कडक कारवाईची तरतूद केली होती. कुठलाही भंग हा बीसीसीआयबरोबरच्या कराराचा भंग मानण्यात येईल, असं बीसीसीआयने म्हटलं होतं आणि त्यासाठी दंडात्मक कारवाईबरोबरच सामने खेळण्यासाठी बंदी आणण्याची तरतूदही होती. (Champions Trophy 2025)

चॅम्पियन्स करंडकापूर्वी काही खेळाडूंनी बीसीसीआयकडे पत्नी व मुलांना बरोबर नेता येईल का अशी विचारणा केली होती. त्यामुळे स्पर्धेचं स्वरुप आणि महत्त्व लक्षात घेता बीसीसीआयने ही सूट दिल्याचं समजतंय. भारतीय संघ आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी खेळणार आहे. तर २३ तारखेला पाकिस्तान आणि ३ मार्चला न्यूझीलंडविरुद्घधचा सामना होणार आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.