Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स विजेत्या भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांची खैरात

Champions Trophy 2025 : आयसीसीपेक्षा तिप्पट मोबदला भारतीय संघाला मिळणार आहे.

67
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स विजेत्या भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांची खैरात
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने नुकतीच चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ गडी राखून पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला आयसीसीने १९.५० कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने देखील भारतीय संघावर बक्षिसाची खैरात केली आहे.

बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यावर आयसीसीकडून मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा तीनपट जास्त रक्कमेचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Narco Terrorism देशासाठी धोकादायक; तरुण पिढीचे रक्षण करण्याची गरज; समीर वानखेडे यांनी केले प्रबोधन)

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०२५ मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही बक्षीस रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांना दिली जाईल.

२०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर, त्याने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २५१ धावा केल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने ८३ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारताने ४९ षटकांत लक्ष्य गाठले. रोहितने अंतिम सामन्यात ७६ धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – BCCI Code of Conduct : खेळाडूंच्या विरोधानंतरही बीसीसीआय परदेश दौऱ्यातील आचारसंहितेवर ठाम)

दरम्यान, आयसीसीकडून मिळणारी बक्षिसाची रक्कम समजून घेऊया – 

विजेता – १९.५ कोटी रुपये (भारत)
उपविजेता – ९.७५ कोटी रुपये (न्यूझीलंड)
उपांत्य फेरी (पराभूत झालेला संघ) – प्रत्येकी ४.८५ कोटी रुपये
पाचवे/सहावे स्थान – ३ कोटी रुपये
७वे/८वे स्थान – १.२ कोटी रुपये

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.