चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) गट टप्प्यातील अखेरचा सामना आज अ गटातील भारत वि. न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. पण कोणते संघ एकमेकांविरूद्ध भिडणा र, हे आजच्या सामन्याच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. (Champions Trophy 2025)
न्यूझीलंडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा धवनच्या नावावर आहेत. या स्पर्धेत त्याने 10 सामन्यांमध्ये 701 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 15 सामन्यांमध्ये 651 धावा केल्या आहेत. तो 51 धावा करताच धवनला मागे टाकेल आणि भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. (Champions Trophy 2025)
भारतीय कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, टॉसमुळे त्याला जास्त नुकसान झाले नाही. कारण आम्हाला ही प्रथम फलंदाजी करायची होती. भारतीय प्लेइंग-11 मध्येही एक बदल आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली आहे. भारताने चार फिरकी गोलंदाज आणि फक्त एक वेगवान गोलंदाज मैदानात उतरवला आहे. हार्दिक दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारेल. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात सलग 13 व्यांदा नाणेफेक गमावली. (Champions Trophy 2025)
टीम इंडियात बदल
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community