- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकाविषयीची अनिश्चितता अजूनही कायम आहे. भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवायला नकार दिला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे का हे अजून स्पष्ट नाही. अशावेळी माजी कर्णधार कपिल देवने चॅम्पियन्स करंडकाविषयी एक सल्ला दोन्ही क्रिकेट मंडळांना दिला आहे. हा प्रश्न क्रिकेटच्या बाहेरचा असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)
‘हे प्रकरण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. स्पर्धेविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आपल्यासारख्या लोकांनी याविषयी मत प्रदर्शन करू नये,’ असं कपिव देव यांनी म्हटलं आहे. १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवला हा प्रश्न क्रिकेटच्या पलीकडे असल्याचं वाटतं. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?)
सध्या चॅम्पियन्स करंडक चषकाचा पाकिस्तान दौरा सुरू आहे. पूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधूनही हा चषक फिरवला जाणार होता. पण, भारताने यावर आक्षेप नोंदवल्यावर पाकव्याप्त काश्मीरमधील दौरा रद्द करण्यात आला. चषकाच्या दौऱ्यामुळे यजमान देशात स्पर्धेविषयीची प्रसिद्धी होते आणि लोकांना स्पर्धा तसंच ठिकाणांबद्दलची माहिती मिळते. इस्लामाबादमध्ये शोएब अख्तर या चषकाबरोबर चाहत्यांची भेट घेणार आहे. (Champions Trophy 2025)
यानंतर लाहोर, अबोटाबाद आणि तक्षीला इथं हा चषक फिरणार आहे. पण, स्पर्धा हायब्रीड होणार की, पाकिस्तानातच होणार आणि त्यात भारतीय संघ सहभागी होणार का यावर अजून स्पष्टता नसल्याने या स्पर्धेचे इतर प्रसिद्धीचे कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहेत. तसंच वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेलं नाही. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community