
-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल वैयक्तिक तातडीच्या कारणामुळे अचानक मायदेशी परतले आहेत. भारतीय संघाबरोबर ते दुबईला होते आणि संघाच्या पहिल्या दोन सराव सत्रांना ते उपस्थित होते. पण, १७ फेब्रुवारीला ते संघाबरोबर नव्हते. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे. ते दुबईत नेमके कधी परततील आणि चॅम्पियन्स करंडकासाठी ते संघाबरोबर असतील का याविषयी अजून अनिश्चितता आहे. (Champions Trophy 2025)
भारतीय संघ सध्या दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर सराव करत आहे आणि इथेच संघ चॅम्पियन्स करंडकातील आपले साखळी सामने खेळणार आहे. १८ फेब्रुवारीला संघासाठी विश्रांतीचा दिवस निर्धारित करण्यात आला होता. १९ तारखेला मात्र संघ पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरेल. त्यानंतर २० तारखेला भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. तर २३ तारखेला भारताचा मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – BMC : जोरदार पावसातही रेल्वे सेवा थांबता कामा नये, अशाप्रकारे नालेसफाईचे काम करा; महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश)
सरावादरम्यान सोमवारी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या गुडघ्यावर चेंडू बसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पंत काहीसा अडखळत चालताना दिसला. पण, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून के. एल. राहुल हा भारताचा पहिला पर्याय असल्याचं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंतला विश्रांतीसाठी वेळ आहे. भारताने संघात ५ फिरकीपटूंना स्थान दिलं आहे. त्यामुळे अंतिम अकरा जणांचा संघ कसा असतो याचं कुतुहल सगळ्यांनाच आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community