-
ऋजुता लुकतुके
येत्या १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडकाचे पडघम वाजणार आहेत. आणि या स्पर्धेचे भारतातील प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने स्पर्धेची जाहिरात सुरू केली आहे. या जाहिरातीचा मुख्य चेहरा आहे. भारताचा माजी कॅप्टन कूल कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने २०१३ साली ही स्पर्धा जिंकली होती. आणि ही स्पर्धा त्याने संघाला कशी जिंकून दिली याचं गुपितच धोनी या जाहिरातीत सांगतो. ‘८ सर्वोत्तम देशांची स्पर्धा असते तेव्हा तुम्हाला डोकं शांत ठेवून काम करावं लागतं,’ असं धोनी म्हणेपर्यंत त्याच्या डोक्यावर थंडगार बर्फाने भरलेली बादली रिकामी होती. मग पुढे धोनी म्हणतो, ‘अशावेळी तुम्हाला लागते धोनी रेफ्रिजरेशन सिस्टिम (डीआरएस).’ मैदानातील गरमीचा मुकाबला करण्यासाठी धोनीला लागते डीआरएस यंत्रणा अशी या जाहिरातीची संकल्पना आहे. (Champions Trophy 2025)
Captain Cool on the field 😌
Captain Cool as a fan 🥵With every match do-or-die in the #ChampionsTrophy, even @msdhoni needs a DRS (Dhoni Refrigeration System) to beat the heat! 👊
📺 #ChampionsTrophyOnJioStar STARTS WED, 19 FEB 2025! | #CaptainNotSoCool pic.twitter.com/nv1XXZoHht
— Star Sports (@StarSportsIndia) January 29, 2025
विशेष म्हणजे धोनी भारतीय संघाचा कर्णधार असताना त्याने ‘कॅप्टन कूल’ धोनी असा लौकिक मिळवला होता, तो कठीण प्रसंगी डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे. भारतीय संघाला त्याने २०१३ मध्ये इंग्लंड इथं चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला होता. भारतीय संघाने हा चषक उंचावण्याची तीच शेवटची वेळ. पण, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक (२००७), एकदिवसीय विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स करंडक (२०१३) या तीनही आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीने दिल्ली संघाबरोबर केला जोरदार सराव, नम्रतेनं जिंकली सहकाऱ्यांची मनं)
यंदाची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरू होत आहे. भारताचे सामने दुबईत होणार असून भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर मुकाबला २३ फेब्रुवारीला दुबईतच होणार आहे. भारतीय संघाचा समावेश ए गटात असून या गटात भारताबरोबरच पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे इतर संघ आहेत. तर बी गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व अफगाणिस्तान हे संघ आहेत. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community