- ऋजुता लुकतुके
२०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमीच आहे. आणि भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेला हलवण्याची विनंती बीसीसीआय आयसीसीकडे करणार आहे, असं क्रिकेट मंडळातील सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. २००८ पासून भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. आणि दोन्ही देश एकमेकांशी फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धेतच खेळले आहेत. (Champions Trophy 2025)
गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा पार पडली. पण, यातील भारताचे सामने हे श्रीलंकेत झाले. बीसीसीआयने तेव्हा पाकिस्तान दौऱ्याला भारत सरकारने परवानगी नाकारल्याचं कारण दिलं होतं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ८ देश सहभागी होणार असून पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Pooja Khedkar यांचा आणखी एक उद्दामपणा; चोराला सोडविण्यासाठी अधिकाऱ्याला फोन)
१९९६ मध्ये पाकिस्तान, भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या झालेला एकदिवसीय विश्वचषक सोडला तर पाकिस्तानमध्ये कुठलीही मोठी क्रिकेट स्पर्धा झालेली नाही. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स करंडकाकडून अपेक्षा आहेत. (Champions Trophy 2025)
दुसरीकडे, भारतीय संघ २००८ पासून पाकिस्तानला गेलेला नाही. भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये जायचं असल्यास त्यासाठी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाची विशेष परवानगी लागते. यापूर्वी अशी परवानगी घेऊन भारताचा लॉन टेनिस संघ गेल्यावर्षी डेव्हिस चषकाच्या सामन्यासाठी पाकिस्तानला गेला होता. दोन दिवसांचा हा दौरा होता. पण, १५ जणांच्या क्रिकेट संघाला केंद्र सरकार अशी परवानगी देईल का हा खरा प्रश्न आहे. तोपर्यंत बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेला हलवण्याची विनंती करण्याचं ठरवलं आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community