
-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाच्या चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) मोहिमेला फक्त एक दिवस बाकी आहे. संघाचा सरावही दुबईत जोरदार सुरू आहे. सरावातील चित्र तरी असं आहे की, फलंदाज इथल्या वातावरणाशी रुळले आहेत. मनासारखी फटकेबाजी नेट्समध्ये करताना दिसत आहेत. फलंदाजी हीच संघाची या स्पर्धेतील ताकद असणार आहे. आणि त्याचवेळी संघात सगळंच काही आलबेल नाही, अशाही बातम्या येत आहेत. बोर्डर – गावसकर मालिकेदरम्यानही (Border – Gavaskar series) तशी चर्चा सुरू होती. अश्विनचा अचानक निवृत्तीचा निर्णय पासून ते ड्रेसिंग रुममधील संभाषण बाहेर पडल्याचं प्रकरण या सगळ्यातून संघातील बिघडलेलं वातावरण समोर येत होतं. आता टाईम्स वृत्तसमुहाने त्या आशयाची बातमी पुन्हा एकदा दिली आहे.
सध्याचा एक यष्टीरक्षक, जो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) पहिली पसंती नाही, असं म्हणतोय की, त्याची संघातील जागा क्रिकेट बाहेरच्या कारणामुळे गेली आहे, असं टाईम्सच्या बातमीत म्हटलं आहे. या बातमीत खेळाडूचं नाव घेतलेलं नाही. तो खेळाडू सध्या दुबईत आहे का, हे ही लिहिलेलं नाही. के एल राहुल (KL Rahul) हा सध्या संधाची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती आहे, असं गौतम गंभीरने स्पष्ट केलं आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा आणखी एक यष्टीरक्षक संघात आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – ‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची Hindu Janajagruti Samiti ची सरकारकडे मागणी !)
शनिवारी सरावादरम्यान ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यावर हार्दिकने मारलेला चेंडू बसला होता. त्यानंतर त्याने सराव सुरू ठेवला असला तरी तो काहीसा लंगडत चालत होता. सोमवारीही तो फक्त फलंदाजीच्या सरावासाठी आला. बाकी सरावात त्याने भाग घेतला नाही. तर के एल राहुल (KL Rahul) मात्र सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यानुसार त्याने मोठे फटके लगावण्याचा जास्त सराव केला. भारताचा पहिला सामना शुक्रवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. (Champions Trophy 2025)
या सामन्यातही यष्टीरक्षक म्हणून के एल राहुल (KL Rahul) खेळणार हे जवळ जवळ निश्चित आहे. आणि एरवी तांत्रिकदृष्ट्या सकस फलंदाजी करणारा राहुल यावेळी आक्रमक फलंदाजी नेट्समध्ये करताना दिसला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community