
-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचं (Champions Trophy 2025) आयोजन पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती इथं संयुक्तपणे झालं. आणि अंतिम सामना रविवारी दुबईत पार पडला. अंतिम सामन्या नंतरच्या बक्षीस समारंभात व्यासपीठावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) होते. पण, पाकिस्तान क्रिकेट मंडळ अर्थात पीसीबीचा एकही अधिकारी नव्हता. यावरून गेले दोन दिवस भरपूर चर्चा झाली होती. पाकिस्ताननेही अध्यक्ष मोहसीन नकवी (Mohsin Naqvi) दुबईत नसेल, तरी दोन प्रतिनिधी तिथे पाठवले होते. पण, त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं नाही, अशी टीका केली होती. काही वृत्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने नंतर आयसीसीकडे तशी लेखी तक्रारही केली. हे सगळं घडल्यानंतर आयसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आणि आयसीसीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त अध्यक्षच असू शकतात. त्यामुळे आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष व्यासपीठावर होते, असं आयसीसीचं म्हणणं आहे.
पाकिस्तान मंडळाने आपले सीओओ आणि स्पर्धेचे संचालक सुमेर अहमद सय्यद यांना दुबईला पाठवलं होतं. पण, त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आलं नाही. पाक मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी (Mohsin Naqvi) यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, असं आयसीसीनं (ICC) स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – Manipur मध्ये BSF जवानांचे वाहन दरीत कोसळले : 3 हुतात्मा, तर 13 जण जखमी)
नकवी देशाचे केंद्रीय मंत्रीही आहेत. त्यामुळे आणखी एका महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे ते चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy 2025) अंतिम सामन्यासाठी दुबईत जाऊ शकले नसल्याचं समजतंय. तर काही वृत्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृतीही ठिक नव्हती. ‘आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेसाठी नियम सारखेच असतात. ते स्पर्धेगणिक बदलत नाहीत. आणि आयसीसीचा नियम असं सांगतो की, व्यासपीठावर मंडळांचे अध्यक्ष, सीईओ, सचिव अशा पदाधिकाऱ्यांनाच बोलावता येतं. त्यानुसार, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे सीईओ रॉजर ट्वोस, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि सचिव देवाजीत सैकिया तसंच आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) हे व्यासपीठावर हजर होते. मंडळांचे इतर पदाधिकारी हजर असले तरी त्यांना व्यासपीठावर बोलावण्याचा प्रघात नाही,’ असं आयसीसीच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
बक्षीस वितरणाच्या वेळी अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी रोहित शर्माला (Rohit Sharma) चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) बहाल केला. तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी चॅम्पियन्स लिहिलेलं खास जॅकेट खेळाडूंना दिलं. सैकिया यांनी खेळाडूंना पदकं दिली. तर किवी सीईओ स्टोस यांनी उपविजेत्यांना दिली जाणारी पदकं बहाल केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community