Champions Trophy 2025 : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स करंडक नेण्याला आयसीसीची अखेर मनाई

Champions Trophy 2025 : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स करंडक नेण्याला भारताचा विरोध होता. 

163
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात भारत-पाक सामना २३ फेब्रुवारीला, जाणून घ्या भारताचं पूर्ण वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

एखादी मोठी स्पर्धा देशात होणार असेल तर त्या चषकाचा दौरा देशातील सर्व प्रमुख शहरांमधून काढण्यात येतो. तो चषक लोकांना दाखवण्यात येतो. त्यामुळे त्या स्पर्धेबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण व्हावी असा उद्देश असतो. एक प्रकारे स्पर्धेची प्रसिद्धी यातून होत असते. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकाचाही असाच दौरा सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे. पण, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हा चषक घेऊन जायला जोरदार विरोध केला होता. आणि तो मान्य करत आयसीसीने पाकिस्तानला चषक तिथे धेऊन जायला मनाई केली आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीने खरंच वय चोरलं?)

चॅम्पियन्स ट्रॉफी १४ नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी केली. यानंतर १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफी पाकिस्तानमध्ये नेली जाईल. पीसीबीने सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती दिली होती. जिथे त्याने सांगितले की, ट्रॉफी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या ठिकाणी जाईल. या चार ठिकाणांपैकी फक्त मारी हा पाकिस्तानचा भाग आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणे स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात.

पाकिस्तानने याची घोषणा करताच बीसीसीआयने आक्षेप घेतला. आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे टीम इंडियाचे चाहते आणखी संतप्त झाले आहेत, परंतु बीसीसीआयने आयसीसीला वेळीच याची माहिती दिली आणि पाकिस्तानला तसे करण्यापासून रोखले. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात)

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. मात्र त्याचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. अशा परिस्थितीत, आयसीसीच्या इतिहासातही ही पहिलीच वेळ आहे की वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी ट्रॉफी यजमान देशात पोहोचली आणि दौराही होईल.

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आधीच आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा संपूर्ण चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानमधून दुसऱ्या देशात हलवली जाईल. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.