- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचा वेळापत्रकाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. त्यामुळेच आयसीसीने या स्पर्धेचा शंख फुंकणारा ११ नोव्हेंरचा एक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. क्रिकबझने तशी बातमी दिली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाविषयीची अनिश्चितता वाढल्याचं दिसत आहे. १९ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२५ दरम्यान पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पण, स्पर्धेच्या वेळापत्रकावरून अजूनही गोंधळ आहेत. खासकरून भारतीय संघ स्पर्धेत सहभागी होणार की नाही, झाला तर भारताचे सामने नक्की कुठे होणार याचा निर्णयही अजून झालेला नाही. (Champions Trophy 2025)
११ नोव्हेंबरला स्पर्धेचा १०० दिवसांचा काऊंटडाऊन सुरू होणार आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करून त्या दिवशी अधिकृत घोषणा करायची असा आयसीसीचा मानस होता. पण, प्रत्यक्षात अजून वेळापत्रकच निश्चित झालेलं नाही. भारतीय संघाला जर केंद्र सरकारने परवानगी दिली नाही, तर त्यांच्यावर जबरदस्ती करता येणार नाही, अशी आयसीसीची भूमिका आहे. तर पाकिस्तानने आपल्या केंद्र सरकारला याविषयी विचारणा केली आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Mumbai Airport वर २.६७ कोटींचे सोने जप्त; दोन कर्मचाऱ्यांना अटक)
म्हणजेच दोन्ही सरकारांनी मिळून यावर निर्णय घ्यावा असं पाक क्रिकेट मंडळाला वाटतंय. शिवाय भारताने सुचवलेला पर्याय हाय-ब्रीड मॉडेलचा आहे, त्यावरही त्यांचा विचार चालला आहे. भारताने संयुक्त अरब अमिराती किंवा कतारमध्ये आपले सामने खेळायला मान्यता दिली आहे. (Champions Trophy 2025)
‘स्पर्धचं वेळापत्रक अजून तयार झालेलं नाही. आयोजक आणि इतर सदस्य देशांशी आमची चर्चा सुरू आहे. एकदा का वेळापत्रक निश्चित झालं की, आम्ही स्पर्धेची अधिकृत घोषणा करू,’ असं आयसीसीच्या अधिकृत प्रवक्त्यांनी क्रिकबझला सांगितलं आहे. भारताच्या सहभागावरून सुरू झालेला गोंधळ आणि त्याचबरोबर लाहोरमध्ये असलेलं धुरकं ही आयसीसी समोरची आणखी एक समस्या असल्याचं बोललं जातंय. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community