-
ऋजुता लुकतुके
आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि भारतीय संघ आपली मोहीम बांगलादेशविरुद्ध येत्या २० तारखेला सुरू करेल. दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर भारताचे सर्व सामने होणार आहेत आणि तिथेच सध्या संघाचा सरावही सुरू आहे. भारतीय संघ स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला, तर तो सामनाही इथेच होणार आहे. अशावेळी दुबईत भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी समजून घेऊया,
भारतीय संघाची दोन सराव सत्र या मैदानावर पार पडली आहेत आणि खेळाडू इथं रुळलेलेही दिसत आहेत. यापूर्वी भारतीय संघ इथं १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे आणि यातील १० सामने भारताने जिंकलेही आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Maharashtra Cabinet Decision: राज्य सरकार अमली पदार्थांच्या विरोधात कठोर पावले उचलणार; मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय)
एकूण सामने |
एकदिवसीय सामने |
|
सामने |
१५ |
६ |
विजय |
१० |
५ |
पराभव |
४ |
० |
बरोबरी |
१ |
१ |
२०२२ चा टी-२० विश्वचषक आणि २०१८ चा आशिया चषक मिळून भारतीय संघ इथं एकूण १५ सामने खेळला आहे. यात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची कामगिरी जास्त चांगली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच २०१८ मध्ये ही स्पर्धा भारताने जिंकली होती. या स्पर्धेत फलंदाजीतही चमकला होता आणि ५ सामन्यांत त्याने १०५ धावांच्या सरासरीने ३१७ धावा केल्या होत्या.
Rohit Sharma speaking to batting coach Sitanshu Kotak during his break between hits in the nets. Assistant coach Abhishek Nayar continues to be on side-arm duties! pic.twitter.com/5NcB2XLb3K
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) February 17, 2025
या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मात्र भारताकडून शिखर धवनच्या नावावर आहे. शिखरने ५ सामन्यांत ६८ धावांच्या सरासरीने ३५२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १०२ धावांचा होता. यात त्याने २ शतकंही ठोकली होती. या मैदानावरील भारताची सर्वाधिक घावसंख्या आहे ७ गडी बाद २८५ धावा. तर गोलंदाजीत सर्वाधिक १० बळी कुलदीप यादवने घेतले आहेत. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – राजधानी दिल्लीत Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan रंगणार; तालकटोरा स्टेडियम सज्ज)
दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवरील भारताची कामगिरी |
|
सर्वात मोठी धावसंख्या |
७/२८५ |
सर्वात कमी धावसंख्या |
२/१६२ |
वैयक्तिक सर्वाधिक धावा |
शिखऱ धवन (३५२) |
वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या |
शिखर धवन (१२७) |
सर्वात जास्त बळी |
कुलदीप यादव १० |
सर्वोत्तम कामगिरी |
रवींद्र जाडेजा (२९ धावांत ४ बळी) |
कुलदीप यादवने या मैदानावर ६ सामन्यांमध्ये २३ धावांच्या सरासरीने १० बळी घेतले आहेत. त्यासाठी त्याने षटकामागे ४.०८ धावा दिल्या आहेत. तर २०१८ च्या आशिया चषकात रवींद्र जाडेजाने बांगलादेशविरुद्ध २९ धावांत ४ बळी मिळवले होते. भारताने या मैदानावर खेळलेल्या ६ एकदिवसीय सामन्यांतील निकाल पाहूया, (Champions Trophy 2025)
१८ सप्टेंबर २०१८ – हाँगकाँगचा २६ धावांनी पराभव
१९ सप्टेंबर २०१८ – पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव
२१ सप्टेंबर २०१८ – बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव
२३ सप्टेंबर २०१८ – पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव
२५ सप्टेंबर २०१८ – अफगाणिस्तानबरोबरचा सामना बरोबरीत सुटला
२८ सप्टेंबर २०१८ – बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव
हेही पहा –
Join Our WhatsApp Community