-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तानवर ६ गडी राखून मात केल्यानंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाच्या ए गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघाने उपान्त्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. तर दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तानचा (Pakistan) संघ तळाला आहे. आणि साखळी स्पर्धेतच त्यांच्यावर टांगती तलवार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यांत बांगलादेशचा पराभव केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने त्यांनी २ सामन्यांतून ४ गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानचा न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध लागोपाठ पराभव झाला आहे. (Champions Trophy 2025)
भारताच्या खालोखाल न्यूझीलंड दुसऱ्या तर बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या स्पर्धेत ८ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटांत पहिले दोन संघ बाद फेरीत जातील. न्यूझीलंडचा संघ एकच सामना खेळला असला तरी बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकण्याची संधी त्यांच्याकडे आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Jasprit Bumrah : भारत – पाक सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा आयसीसी पुरस्काराने गौरव)
भारताने रविवारी झालेल्या सामन्यांत पाकिस्तानचा (Pakistan) ६ गडी आणि ४५ चेंडू राखून पराभव केला. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत २४१ धावा केल्या होत्या. पण, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद १०० धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला. कुलदीप यादवने ४४ धावांत ३ बळी घेत गोलंदाजीत अव्वल कामगिरी केली. कोहलीला श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलची (Shubman Gill) चांगली साथ मिळाली. आणि सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने उपान्त्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे.
ब गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अव्वल दोन क्रमांकांवर आहेत.
(हेही वाचा – लष्करप्रमुख जनरल Upendra Dwivedi फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community