Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा दुबईत सराव सुरू, पंतच्या गुडघ्यावर बसला अर्शदीपचा चेंडू

Champions Trophy 2025 : विराट कोहलीने फलंदाजीसाठी बॅटची पारख करण्यासाठी अर्धा तास घेतला.

51
Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा दुबईत सराव सुरू, पंतच्या गुडघ्यावर बसला अर्शदीपचा चेंडू
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला पोहोचल्यानंतर २० तासांच्या आत भारतीय संघाने आपला सराव सुरू केला. आयसीसी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी तीन तासांच्या वर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तसंच गोलंदाजीचा सराव केला. विराट कोहलीची एक सवय आहे कुठल्याही वर्कआऊटनंतर विशिष्ट नाश्ता करून शरीराला पोषण देण्याची. इथंही त्याने मैदानात उतरण्यापूर्वी स्थानिक कर्मचाऱ्याला त्याला लागणाऱ्या डिशची माहिती दिली आणि सराव संपताना ते पदार्थ त्याच्यासाठी तयार होते. त्यानंतर विराटने आपल्या किटमधील बॅटचाही अभ्यास केला आणि त्यानंतरच त्याने फलंदाजीच्या सरावासाठी योग्य ती बॅट निवडली. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : दुबईत गंभीर आणि आगरकर यांच्यात मैदानातच रंगला वाद?)

सुरुवात क्षेत्ररक्षणाच्या सरावाने झाली आणि त्यानंतर रोहित, विराट आणि हार्दिक पांड्या यांनी नेट्समध्ये तासभर फलंदाजीचा सराव केला. विराटला मधल्या किंवा थेट उजव्या यष्टीवर मारा केला जात होता. मोहम्मद शमी आणि अर्शदीप यांनी मुख्यत्वे विराट आणि रोहितला गोलंदाजी केली. अर्शदीप वेग आणि अचूकतेच्या बाबतीत जास्त सरस होता आणि त्याच्या काही आत वळलेल्या चेंडूंनी रोहितला चकवलंही. पण, एरवी रोहित आणि विराट बॅटच्या मध्येभागी चेंडू बसेल असे खेळत होते. त्यांनी फ्रंटफूट आणि बॅकफूटच्या फटक्यांचाही सराव केला.

श्रेयस अय्यर आणि हार्दिक यांनी मोठे फटके खेळण्याचा सराव केला. त्यांना जडेजा, अक्षर, कुलदीप हे फिरकीपटू चेंड़ू टाकत होते. गौतम गंभीर नेट्सच्या मागे उभा राहून फलंदाजांची कामगिरी पाहत होता. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – प्रवासाला निघण्यापूर्वी आता FASTag बॅलन्स नक्की तपासा; लागू झाले आहेत नवे नियम)

हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा सरावही केला आणि त्याचा एक चेंडू रिषभ पंतच्या डाव्या गुडघ्यावर बसला. २०२२ मध्ये पंतला रस्ते अपघात झाला तेव्हा त्याच्या याच गुडघ्याला मार बसला होता. त्यामुळे आता संघाचे फीजिओ आणि इतर डॉक्टर तातडीने रिषभच्या मदतीला धावले. रिषभ कळवळलेला दिसला. गुडघ्याला पट्ट्या बांधल्यानंतर त्याने पुन्हा काही काळ फलंदाजीचा सराव केला. पण, तो नंतरही चालताना अडखळत होता. (Champions Trophy 2025)

भारतीय संघाचा पहिला सराव पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विराट कोहलीकडून तरुणांना स्वाक्षरी हवी होती. भारतीय संघ २० फेब्रुवारीला आपला पहिला सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर खेळणार आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.