-
ऋजुता लुकतुके
भारताच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे कायम राहणार आहे. आणि शनिवारी (आज) चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघ निवडण्यात येतील तेव्हा त्यात फारसे धक्केही बसण्याचीही शक्यता नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली १५ जणांचा संघ निवडला जाणार आहे. आणि यात दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या समावेशाची शक्यता कमीच आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता बीसीसीआयने रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची एक पत्रकार परिषदच जाहीर केली आहे. त्यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू)
भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकातील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. १९ फेब्रुवारीला स्पर्धा सुरू होणार असली तरी भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध आहे. त्यापूर्वी भारतीय संघ मायदेशातच इंग्लंड विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. टी-२० संघाची धोषणा यापूर्वीच झाली आहे. आता शनिवारी एकदिवसीय संघाची घोषणा होईल, असं दिसतंय. (Champions Trophy 2025)
रोहित स्वत: खराब फॉर्मशी झुंजतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्यांत त्याने ६ च्या सरासरीने फक्त ३१ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या सिडनी कसोटीतून त्याने ऐनवेळी माघारही घेतली. त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. पण, रोहितने आपण आणखी क्रिकेट खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर बीसीसीआयनेही त्याच्यावर खेळाडू आणि कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय)
बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं सक्तीचं केलं आहे. अशावेळी सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषकात संजू सॅमसन खेळला नाहीए. त्याचा विचार चॅम्पियन्स करंडकासाठी होणार का? याच स्पर्धेत खोऱ्याने धावा करणारा करुण नायर पुन्हा संधी मिळणार का? श्रेयस अय्यर संघातील जागा कायम ठेवणार का? आणि महत्त्वाचं म्हणजे बुमराहच्या दुखापतीचं स्वरुप नेमकं काय आहे आणि तो ही स्पर्धा खेळणार का, या प्रश्नांची उत्तरं आता शनिवारी मिळतील. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community