
-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १० दिवसांवर येऊन ठेपली असताना बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या निळ्या जर्सीचं अनावरण केलं आहे. नवीन जर्सी घातलेले खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर उघड करताना यात एक महत्त्वाचं नाव आणि फोटो नाहीए. आणि ते नाव आहे खुद्ध कर्णधार रोहित शर्माचं. त्यामुळे वेगळीच चर्चा बुधवारी सुरू झाली आहे. रोहित शर्माचंच एक जुनं ट्विट त्यामुळे पुन्हा व्हायरल होत आहे. बीसीसीआयने नागपूरमध्ये संघातील सर्व खेळाडूंचं नवीन जर्सीतील फोटो-शूट केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही हीच जर्सी घालून संघ मैदानात उतरणार आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Crime News : नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे 12 लाख रुपयाचे 3 इंजिन जप्त)
१५ फोटो बीसीसीआयच्या ट्विटमध्ये आहेत. पण, यात रोहितचा फोटो मात्र नाही. (Champions Trophy 2025)
New threads 🧵
…And with that – Bright Smiles 😁💙#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Sgs1gG7rvf
— BCCI (@BCCI) February 5, 2025
रोहितच्या नसण्यामुळे त्याचंच एक जुनं ट्विट व्हायरल होऊ लागलं आहे. २०२० साली रोहितने आयसीसीच्या एका फोटोंच्या कोलाजवर प्रतिक्रिया देताना केलेलं हे जुनं ट्विट आहे. यात रोहित म्हणतो, ‘या कोलाजमध्ये काहीतरी चुकलंय का? घरून काम करणं वाटतं तितकं सोपं नाही!’ (Champions Trophy 2025)
भारतीय कर्णधार सध्या खराब फॉर्मशी झगडतोय. आणि नागपूरच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी याविषयीचा प्रश्न त्याला पत्रकारांनी विचारला, तेव्हा त्याने तो उडवून लावला. ‘मी इथं माझा फॉर्म आणि निवृत्तीवर बोलणार नाही. सध्या मी तीन एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. अशावेळी मी निवृत्तीचा विचारही करू शकत नाही,’ असं रोहित म्हणाला. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय पंच नितीन मेमन यांचाही पाकला जायला नकार)
३७ वर्षीय रोहितने ऑस्ट्रेलियात ३ कसोटींमध्ये ६ धावांच्या सरासरीने फक्त ३१ धावा केल्या आहेत. आणि खराब फॉर्ममुळे त्याने अखेरच्या सिडनी कसोटींत स्वत:ला वगळलं होतं. आता इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ही त्याच्यासमोर फॉर्म पुन्हा शोधण्याची एक चांगली संधी आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला जाणार आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community