-
ऋजुता लुकतुके
भारतीय खेळाडूंबरोबरच आंतरराष्ट्रीय पॅनलमधील क्रिकेट पंच नितीन मेमन यांनीही चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जायला नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचा एकही पंच नसेल. तर सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथही जबाबदारी सांभाळताना दिसणार नाही. आयसीसीने बुधवारी उशिरा चॅम्पियन्स करंडकासाठी ३ सामनाधिकारी आणि १२ मैदानावरील पंचांच्या नावाची घोषणा केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, श्रीलंकेचे रंजन मुदगले आणि झिंबाब्वेचे अँड्र्यू पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर इतर १२ पंच मैदानावरील पंच आणि तिसरे पंच म्हणून काम पाहतील. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध खेळणार का, रोहित शर्मा काय म्हणाला?)
‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ४ ठिकाणी होणार आहे. यातील ३ ठिकाणं पाकिस्तानात आहेत. कराची, रावळपिंडी आणि लाहोर इथं सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी आपण उपलब्ध नसल्याचं भारताचे नितीन मेमन यांनी आयसीसीला कळवलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी माघार घेतली आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Champions Trophy 2025)
UMPIRES FOR THE CHAMPIONS TROPHY 2025. 🏆
– Dharmasena, Gaffaney, Gough, Holdstock, Illingworth, Kettleborough, Ahsan Raza, Reiffel, Sharfuddoula, Tucker, Wharf, Wilson. pic.twitter.com/S3NYqOq3cn
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) February 5, 2025
आयसीसीच्या धोरणानुसार, पंच हा त्रयस्थ देशाचा असतो. त्यामुळे मेमन हे भारताच्या सामन्यात पंच म्हणून काम करू शकले नसते. अशावेळी त्यांनी स्पर्धेपासून लांब राहण्याचाच निर्णय घेतल्याचं दिसतंय. आयसीसीने मेमन यांच्या अनुपस्थितीविषयी कुठलंही कारण दिलेलं नाही. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Ration Card : ई-केवायसी करा, नाहीतर ‘या’ तारखेनंतर रेशन धान्य होणार बंद)
चॅम्पियन्स करंडकासाठीचे ३ सामनाधिकारी,
रंजन मुदगले, डेव्हिड बून व अँड्र्यू पायक्रॉफ्ट
मैदानावरील तसंच तिसरे पंच – कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफेनी, मायकेल गॉ, ॲड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, अहसान रझा, पॉल रायफल, शर्फुद्दोला इब्न शाहीन, रॉडनी टकर, ॲलेक्स वॉर्फ व जोएल विल्सन
हेही पहा-
Join Our WhatsApp Community