-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसू शकतो. स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळण्याची शंका कमीच आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी कसोटीतच बुमकाच्या पाठीत उसण भरली होती. तिथे स्कॅन करून घेतल्यानंतर बुमराने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. सध्या त्याच्या पाठीला सूज आली आहे. आणि तो लवकरच बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होणार आहे. तिथे त्याच्या दुखण्याचं निश्चित स्वरुप स्पष्ट होईल. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षण प्रदर्शनीचे उद्घाटन!)
पण, त्याला होत असलेला त्रास पाहता तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. बुमराहची गोलंदाजीची शैली थोडी वेगळी आहे. त्यामुळे कमी रनअपमध्ये तो गोलंदाजीत ताकद आणू शकतो आणि ताशी १४० किमींच्या वेगाने तो गोलंदाजीही करतो. पण, त्याचा भार त्याच्या पाठीवर येतो. ऑस्ट्रेलियात १५४ षटकं टाकल्यानंतर सिडनी कसोटीत त्याची पाठ दुखावली. आणि फेब्रुवारीत चॅम्पियन्स करंडकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता प्रथमदर्शनी कमीच आहे. (Champions Trophy 2025)
निवड समितीची शनिवारी मुंबईत एक बैठक झाली. आणि तेव्हा इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. यात मोहम्मद शमीने पुनरागमन केलं असलं तरी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या बीसीसीआयने फक्त इंग्लंड मालिकेसाठीच संघ जाहीर केला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी संघ निवडीची अंतिम मुदत १२ जानेवारी होती. पण, बीसीसीआयने आयसीसीकडे मुदतवाढ मागितली आहे. बुमराहच्या तंदुरुस्तीविषयीचा अहवाल त्यांना हवा आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ)
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियातील मालिकेत ५ कसोटींत मिळून १५२ षटकं टाकली. आणि यात त्याने १३.०६ धावांच्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. त्याचा स्ट्राईकरेटही प्रभावी होता. यापूर्वीही २०२२ मध्ये बुमराह पाठदुखीने त्रस्त होता. आणि जवळ जवळ वर्षभर खेळला नव्हता. अखेर आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केलं होतं. तेव्हा त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. (Champions Trophy 2025)
दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी त्यांच्या भवितव्याविषयी चर्चा केल्याचं समजतंय. दोघंही सध्या कसोटीत खराब फॉर्मशी झगडतायत. कोहलीने ऑस्ट्रेलियात २३ च्या सरासरीने १९० धावा केल्या तर रोहित ने ६ धावांच्या सरासरीने ३१ धावा केल्या आहेत. ते किती काळ भारतीय संघात राहतात आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळतात का, हा आता प्रश्न आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू)
तर इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत यशस्वी जयसवाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल यांना वगळण्यात आलेलं नाही, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे. तिघांना विश्रांती देण्यात आल्याचं आणि एकदिवसीय मालिकेत ते खेळतील, असं सांगण्यात येत आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community