-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघ येत्या गुरुवारी आपला पहिला सामना बांगलादेशशी खेळणार आहे. दुबईत भारतीय संघाची तीन सराव सत्र पार पडली असून संघ चांगला जमून आलेला वाटत आहे. त्याचवेळी संघात ५ फिरकीपटूंचा समावेश असल्यामुळे यातील नेमक्या कुणाला खेळण्याची संधी मिळणार आणि अंतिम अकरा जणांचा संघ कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. सराव सत्रात सुरू असलेल्या क्षेत्ररक्षणाच्या कवायती आणि फलंदाजीचा सराव यातून अनेकदा अंतिम अकरा जणांचा अंदाज बांधता येतो. कारण, संघाचा सरावही त्याच पद्धतीने सुरू असतो. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Virat Kohli : ‘चॅम्पियन्स करंडकात विराट चॅम्पियनसारखी फलंदाजी करेल’ – विराटचे प्रशिक्षक)
आघाडीचे फलंदाज नेहमी तेज गोलंदाजांचा सुरुवातीला सामना करतात. कारण, पहिली षटकं नेहमी तेज गोलंदाज टाकत असतात. त्यानंतर फिरकीपटूंची वेळ येते. ते पाहता, भारताचे पहिले सहा खेळाडू पुढीलप्रमाणे असू शकतात. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नेटमध्ये याच क्रमाने सराव केला आहे. तर शमी आणि अर्शदीप यांनी कायम एकत्र गोलंदाजी केली आहे. त्यांच्याशिवाय कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे देखील सरावासाठी आले होते. त्यामुळे गोलंदाजीची धुरा हे पाच खेळाडू सांभाळतील अशी लक्षणं आहेत. (Champions Trophy 2025)
अंतिम अकरा जणांचा संघ सामन्यापूर्वीच उघड होईल. पण, असा अंदाज आहे की, पहिल्या सामन्यातून तरी रिषभ पंत, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना बाहेर बसावं लागेल. त्यातच रिषभ पंतला गुडघ्यावर चेंडू बसून दुखापतही झाली आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community