Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकातून माघार घेऊ शकतो का?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकातून माघार घेतल्यास त्याचे काय परिणाम होतील?

231
Champions Trophy 2025 : पाक क्रिकेट मंडळाने हायब्रीड मॉडेलचा पर्याय नाकारला?
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट संघासमोर नेहमीचा पेच उभा राहिला आहे. क्रिकेट संघाच्या पाकिस्तानमध्ये जाण्याला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याचं बातमी आहे. यावेळी पाकिस्तानही सामने पाकबाहेर हलवण्यासाठी तयार नसल्याचं समजतंय. त्यामुळे भारतीय संघ पाकला जाणार का आणि नाही गेला तर काय होणार हा नेहमीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. (Champions Trophy 2025)

बीसीसीआयने सध्या पाक बोर्डासमोर ठेवलेला पर्याय असा आहे की, भारतीय संघाचे सामने दुबई किंवा शारजा किंवा श्रीलंकेत घ्यावेत. पाक बोर्डाने यावर आपलं अधिकृत मत अजून कळवलेलं नाही. त्यांची यावर चर्चाही झालेली नाही. पण, कदाचित त्यांना भारताचा प्रस्ताव स्वीकारण्यावाचून पर्याय उरणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने स्पर्धेतून माघारच घेतली तर काय होईल हे एकदा पाहूया. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Saina vs Angkrish : सायनावर केलेलं ट्विट अंगक्रिश रघुवंशीने घेतलं मागे, माफीही मागितली)

पाक बोर्डाने केली ‘ही’ मागणी 

सगळ्यात आधी भारतीय संघाची स्पर्धेतील जागा श्रीलंकेला मिळेल. पहिले आठ संघ चॅम्पियन्स करंडकात खेळतात. आणि भारत खेळला नाही तर श्रीलंका स्पर्धेसाठी पात्र ठरेल. कारण, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात लंकन संघ नववा आला होता. भारतीय संघ खेळला नाही तर पाकला त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यापूर्वी पाक बोर्डाने आयसीसीकडे केली आहे. त्यावर आयसीसी विचार विनिमय करून निर्णय घेईल. (Champions Trophy 2025)

भारतीय संघाने २००८ नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेट बोर्डाच्या स्पर्धांमध्ये दोन संघ आमने सामने येतात. २०२३ च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला. पण, भारतीय संघ पाकिस्तानात खेळलेला नाही. आशिया चषकात गेल्यावर्षी भारतीय संघाचे सामने त्रयस्थ ठिकाणी झाले होते. आताही भारताची विनंती तीच आहे. तर पाकिस्तानसाठी आयसीसीची एखादी स्पर्धा संपूर्णपणे आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी १९९६ चा विश्वचषक पाक, भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.