-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात एक नवीन वाद निर्माण होताना दिसत आहे. या स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’ (यजमान देश) नाव प्रिंट होणार आहे. आणि याला बीसीसीआयचा आक्षेप आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेचा अधिकृत यजमान देश आहे. पण, भारताने पाकिस्तानला जायला नकार दिल्यानंतर भारताचे सामने दुबईत हलवण्यात आले. आणि त्यामुळे पाकिस्तान आणि युएई हे स्पर्धेचे आयोजक देश झाले. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- हिंदु सणांच्या वेळी Taj Mahal मध्ये जलाभिषेक करू द्या; योगी युवा ब्रिगेडच्या याचिकेवरील सुनावणी ६ मार्चला)
हा तोडगा तर निघाला पण, आता जर्सीवर यजमान देशाचं नाव पाकिस्तान प्रिंट होत असल्यामुळे बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. आणि त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीच्या एका पदाधिकाऱ्याने आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय भूमिकेवर टीका केली आहे. ‘बीसीसीआय आता क्रिकेटमध्ये राजकारण घुसवू पाहत आहे. आणि खेळासाठी हे चांगलं नाही. आधी त्यांनी पाकिस्तानला येणार नाही असं सांगितलं. आता जर्सीवरूनही ते वाद निर्माण करत आहेत. आयसीसी या बाबतीत पाकिस्तानला पाठिंबा देईल अशी आम्ही अपेक्षा करतो,’ असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)
यापूर्वी कर्णधारांच्या एकत्र फोटो-शूटसाठीही बीसीसीआयने रोहित शर्माला पाकिस्तानला पाठवायला नकार दिला होता.
‘BCCI is bringing politics into cricket, which is not at all good for the game. They refused to travel Pakistan. They don’t want to send their captain for the opening ceremony, now there are reports that they don’t want host nation (Pakistan) name printed on their jersey. We… pic.twitter.com/Z9FrF9FKit
— IANS (@ians_india) January 20, 2025
चॅम्पियन्स करंडकासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. पण, स्पर्धेच्या मार्गातील अडचणी थांबलेल्या नाही. नवनवीन वाद निर्माण होत आहेत. त्यातच स्पर्धेसाठी पाकिस्तानची तयारी हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण, कराची, लाहोर आणि रावळपिंडी अशा तीन ठिकाणी स्पर्धेतील सामने होणार आहेत. पण, तिथे स्टेडिअमचं नुतनीकरण अजून पूर्ण झालेलं नाही. (Champions Trophy 2025)
जानेवारी संपेपर्यंत हे काम पूर्ण करण्याची हमी पाकिस्तानने दिली असली तरी आयसीसीची चिंता स्पष्ट दिसत आहे. अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही स्पर्धा पूर्णपणे दुबईत हलवण्याची तयारी आयसीसीने ठेवली आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community