-
ऋजुता लुकतुके
लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमच्या नुतनीकरणाचं काम १०० टक्के पूर्ण झाल्याचं पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जाहीर केलं आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकापूर्वी एक तरी मैदान आता आयसीसीकडे हस्तांतरणासाठी तयार असेल. विक्रमी ११७ दिवसांत इथलं काम पूर्ण करण्यात आलं आहे. नवीन स्टेडिअममधील सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तर आसन क्षमताही वाढली आहे. नवीन स्टेडिअममधील फ्लडलाईट्स एलईडी प्रकारचे म्हणजे आधुनिक आहेत. इथले कॉर्पोरेट बॉक्सेसही अधिक आरामदायी करण्यात आले आहेत. तर मैदानात इलेक्ट्रॉनिक गुणफलकही बसवण्यात आला आहे. दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रुमही अद्ययावत करण्यात आल्या आहेत. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Digital Arrest च्या प्रकरणी ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक)
‘सगळीकडून टीका आणि उपहास होत असताना कर्मचारी आणि पाक सरकारने केलेल्या मदतीमुळे गद्दाफी स्टेडिअमचं काम वेळेत पूर्ण झालं आहे. आणि हे मैदान चॅम्पियन्स करंडकाचे सामने आयोजित करण्यासाठी सज्ज आहे,’ असं पाक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी पत्रक काढून म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)
Breaking News: Qaddafi Stadium Fully Ready to Host Champions Trophy – Grand Unveiling Tomorrow! #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/hf8V2OYAAQ
— Hamza Ijaz (@HamzaEjaz367) February 6, 2025
आता लाहोरचं स्टेडिअम पूर्ण झालं असलं तरी निर्धारित मुदतीपेक्षा ५ आठवड्याचा जास्त कालावधी त्यासाठी लागला आहे. अखेर आयसीसीने मुदत वाढवून दिल्यानंतर आता लाहोर, रावळपिंडी आणि कराचीतील तीनही स्टेडिअम येत्या १२ फेब्रुवारीला आयसीसीकडे स्पर्धा आयोजनासाठी सुपूर्द करण्यात येतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरिफ यांच्याहस्ते शुक्रवारी स्टेडिअमचं अधिकृत उद्घाटन होणार आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Ind vs Eng, 1st ODI : विराट कोहलीला झालेली दुखापत नेमकी किती गंभीर?)
१,००० च्या वर कामगारांनी स्टेडिअमचं नुतनीकरण चॅम्पियन्स करंडकापूर्वी पूर्ण करण्यासाठी काम केलं आहे. आता येत्या ८ फेब्रुवारीला या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा तिरंगी मालिकेतील सामना होणार आहे. त्यानंतर चॅम्पियन्स करंडकातील उद्घाटनाचा सामनाही इथेच होणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत संयुक्तपणे चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पार पडणार आहे. भारताने पाकला जायला नकार दिल्यामुळे भारताचे सामने दुबईत होणार आहेत. ९ मार्चला स्पर्धेचा अंतिम सामना होईल. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community