Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला १ कोटी रुपयांचा जॅकपॉट

आयोजनातून पाकला मिळणाऱ्या रकमेत अनपेक्षित वाढ झाली आहे.

48
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला १ कोटी रुपयांचा जॅकपॉट
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला १ कोटी रुपयांचा जॅकपॉट
  • ऋजुता लुकतुके

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला १ कोटी रुपयांचा नफा झाल्याचं पाक मंडळाने जाहीर केलं आहे. स्पर्धेसाठीचा सगळा खर्च हा आयसीसीने (ICC) केला. त्यामुळे आयोजनासाठी मिळालेल्या निधीतून १ कोटी रुपये वाचवणं शक्य झाल्याचं पाक मंडळाचे प्रवक्ते आमीर मीर (Amir Mir) आणि मुख्य वित्तीय अधिकारी जावेद मुर्तझा यांनी सांगितलं आहे. ‘आयसीसीने सर्व खर्च केला आहे. आणि ऑडिट पूर्ण झाल्यावर पाक मंडळाला आणखी ३ अब्ज रुपये आयसीसीकडून (ICC) मिळतील, असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे मंडळाला अपेक्षेपेक्षा १ अब्ज रुपये जास्तच मिळाले आहेत,’ असं मीर (Amir Mir) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy 2025) आयोजनातून २ अब्ज रुपयांचा फायदा होईल असा पाक मंडळाचा सुरुवातीचा अंदाज होता. एकूणच या आर्थिक वर्षांत पाक मंडळाला एकूण १० अब्ज रुपयांची कमाई झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मंडळाच्या महसूलात ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय यामुळे पाक क्रिकेट मंडळ जगातील पहिल्या तीन श्रीमंत क्रिकेट मंडळांच्या यादीत विराजमान झालं आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा; Ravindra Waikar यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी)

‘पाक मंडळाची आर्थिक स्थिती यामुळे सुधारली आहे. आणि पीसीबी जगातील अव्वल तीन बोर्डांमध्ये पोहोचलं आहे. मंडळाने या आर्थिक वर्षांत ४० लाख रुपये करापोटी भरले आहेत,’ अशी माहितीही मीर यांनी दिली. पाक मंडळाच्या कामगिरीचं श्रेय त्यांनी अध्यक्ष मोहसीन नकवी यांना दिलं. बोर्डाकडे शिल्लक असलेल्या पैशातून आता रावळपिंडी, कराची आणि फैसलाबाद येथील मैदानांचा विकास करण्यात येणार आहे.

चॅम्पियन्स करंडकापूर्वी (Champions Trophy 2025) तीन स्टेडिअमच्या नुतनीकरणावर पाक मंडळाने १० अब्ज रुपये खर्च केले आहेत. आता उर्वरित २ अब्ज रुपये खर्च करून काम पूर्ण करण्यात येणार आहे. अलीकडेच पाक मंडळाने स्थानिक स्पर्धांमध्ये पाक खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात कपात केली होती. हा निर्णय मंडळाचे अध्यक्ष नकवी (Mohsin Naqvi) यांनी आता मागे घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.