Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानची भारताशी टक्कर; भारताऐवजी श्रीलंकेला संधी?

Champions Trophy 2025 : भारताने अजूनही चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी तयारी दर्शवलेली नाही 

185
Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला यावं यासाठी पाकचा नवीन प्रस्ताव
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) स्पर्धा पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. पण, भारताने अजूनही पाकिस्तानमध्ये खेळण्याची तयारी दाखवलेली नाही. पण, यंदा पाकिस्तान आयसीसीसमोर आक्रमकपणे आपली बाजू मांडत आहे. आणि भारताबरोबर किंवा भारताशिवाय अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसतेय.. चॅम्पियन्स करंडकासाठी ७ संघ निश्चित झाले आहेत, आणि भारताने पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला तर त्यांच्याऐवजी श्रीलंकेला संधी द्यावी अशी भूमिका आता पाकिस्तानने घेतल्याचं दिसतंय.

खरंतर भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पात्र ठरलेला आहे. कारण, एकदिवसीय विश्वचषकातील पहिले आठ संघ हे चॅम्पियन्स करंडकात खेळतात. पण, ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत असल्यामुळे भारताने अजून संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यावर निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकात भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहेत. २००८ पासून टीम इंडिया पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळायला गेली नसल्यामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकासाठी असेच घडण्याची शक्यता फार कमीच आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील हायब्रिड मॉडेलप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेळवण्यास सहमत नाही. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? )

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) फक्त पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट आहे. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणत्याही हायब्रीड मॉडेलच्या बाजूने नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला नाही, तर टीम इंडियाची जागी श्रीलंकेला संधी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका नवव्या क्रमांकावर होता. अव्वल ८ संघांपैकी कोणताही एक संघ बाहेर पडला, तर विश्वचषकातील गुणतालिकेच्या आधारे श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास पात्र ठरेल.

गेल्या वर्षी आशिया चषक ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी; Aditi Tatkare यांनी केले आवाहन)

भारतानं २०२३ मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं २००८ नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल १६  वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच १ मार्च २०२५ रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.  (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.