- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात ए गटातील चित्र जितकं स्पष्ट आहे, तितकीच बी गटातील चुरस मोठी आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यानचा सामना पावसात वाहून गेल्यामुळे तर चुरस आणखी वाढली आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला धक्का देत ही चुरस आणखी वाढवली आहे. या गटात आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. आणि ते पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत. पण, तिसरा असलेला अफगाणिस्तानही (Afghanistan) शर्यतीत कायम आहे. कसा ते पाहूया,
बी गटातील दोन सामने आता बाकी आहेत. एक मुकाबला शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान रंगेल. तर त्या पुढील सामना शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यान असेल. यातील एक सामना लाहोरच्या गद्दाफी मैदानावर तर दुसरा कराचीत नॅशनल स्टेडिअमवर असेल. आणि या दोन सामन्यांतूनच ठरेल उपान्त्य फेरीचे अंतिम दोन संघ.
(हेही वाचा – देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : Nitesh Rane)
ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलियन संघ जिंकला तर – ऑस्ट्रेलियन संघ जिंकला तर त्यांना आणखी २ गुण मिळतील आणि ते ५ गुणांसह उपान्त्य फेरीतील आपलं स्थान पक्क करतील. तर अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद होईल.
अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर – अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर त्यांचे ४ गुण होतील. आणि ते आरामात उपान्त्य फेरीत पोहोचतील. उलट ऑस्ट्रेलियन संघ ३ गुणांवर राहील.
सामना अनिर्णित राहिल्यास – पावसामुळे सामना अनिर्णित राहिला तर स्पर्धेतील चुरस खऱ्या अर्थाने वाढेल. यापूर्वी दोन सामने पावसात वाहून गेले आहेत. त्यामुळे याही वेळी तशी शक्यता आहे. आणि अशावेळी ऑस्ट्रेलियन संघाचे ४ गुण होतील. आणि ते उपान्त्य फेरीत नक्की पोहचतील. अफगाणिस्तानला इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालावर लक्ष ठेवावं लागेल. त्यात आफ्रिकन संघ हरला तर त्यांना आशा बाळगता येतील.
(हेही वाचा – महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?)
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
शुक्रवारच्या सामन्यांत आफ्रिकन संघ जिंकला तर या सामन्याचा निकाल महत्त्वाचा ठरत नाही. अशा परिस्थितीत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपान्त्य फेरी गाठतील. पण, ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला किंवा सामना अनिर्णित राहिला तर हा सामना महत्त्वाचा ठरेल.
इंग्लंडने आफ्रिकन संघाचा पराभव केल्यास – ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचे संघ प्रत्येकी ३ गुणांवर राहतील. आणि सरस धावगतीच्या आधारे दोघांमधील एक संघ उपान्त्य फेरीत पोहोचेल.
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान सामना अनिर्णित राहिल्यावर इंग्लिश संघ जिंकला तर – अशावेळी ऑस्ट्रेलियन संघ ४ गुणांसह उपान्त्य फेरीत पोहोचेल. आणि आफ्रिका तसंच अफगाणिस्तानचे प्रत्येकी ३ गुण होतील. आणि सरस धावगतीच्या आधारे यांच्यातील एक संघ बाद फेरीत जाईल.
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान सामना अनिर्णित राहिल्यावर आफ्रिकन संघ जिंकला तर – आफ्रिकन संघाचे ५ तर ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होतील. आणि हे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील.
ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव आणि इंग्लंड, आफ्रिकेतील सामना अनिर्णित झाला तर – अशावेळी आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन संघांचे प्रत्येकी ४ गुण होतील. आणि हे दोन संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील.
दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर प्रत्येकी ४ गुणांसह दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community