Champions Trophy 2025: चॅम्पियन्स करंडकासाठी शुभमन गिल उपकर्णधार, कुलदीप यादवची वापसी

जसप्रीत बुमराह तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा.

43
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स करंडकासाठी शुभमन गिल उपकर्णधार, कुलदीप यादवची वापसी
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स करंडकासाठी शुभमन गिल उपकर्णधार, कुलदीप यादवची वापसी
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy 2025) फारसे आश्चर्याचे धक्के न देता भारतीय निवड समितीने आपला १५ जणांचा एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. रोहितचा उपकप्तान शुभमन गिल (Shubman Gill) असेल. तर श्रेयस अय्यरने अपेक्षेप्रमाणेच संघात पुनरागमन केलं आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. तर विजय हजारे चषक न खेळणाऱ्या संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांचा विचार झालेला दिसत नाही. तर विजय हजारे चषकात खोऱ्याने धावा करणाऱ्या करुण नायरचाही विचार झाला नाही.

‘सध्या ४० पेक्षा जास्त सरासरी असलेले कितीतरी फलंदाज भारतात आहेत. सगळ्यांना संघात स्थान मिळणं शक्य नाही. खेळपट्टी, वातावरण आणि स्पर्धेचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही संघ निवड केली आहे,’ असं थोडक्यात उत्तर अजित आगरकर यांनी दिलं. दुसरा मुद्दा होता तो जसप्रीत बुमराहचा. तो चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy 2025) तंदुरुस्त असेल, असं समजतंय. त्यामुळे तो संघात आहे. पण, इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळण्याची शक्यता नसल्यामुळे त्याच्याऐवजी हर्षित राणाला (Harshit Rana) संघात बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

(हेही वाचा – तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य – CM Devendra Fadnavis)

रोहित शर्मा, (Rohit Sharma) यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे तिघे सलामीवीर असतील. तर विराट, श्रेयस, राहुल हे मधल्या फळीत असतील. त्यानंतर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू असतील. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग हे तीन तेज गोलंदाज संघात आहेत. यात जसप्रीत बुमराह आणि शमी या दोघांच्या तंदुरुस्तीवर अजूनही सवाल आहेत. आणि इंग्लंडविरुद्ध तो तंदुरुस्त नसल्यास हर्षित राणाचा (Harshit Rana) पर्याय निवड समितीने ठेवला आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा दिल्ली रणजी संघात समावेश, दुखापतीमुळे खेळण्याविषयी अनिश्चितता कायम)

याचाच अर्थ संघात ३ तेज गोलंदाज, ३ अष्टपैलू खेळाडू आणि ३ फिरकीपटू असतील. यात निवड समितीने मोहम्मद सिराजचा विचार केलेला नाही. त्याच्या जागी अर्शदीप संघात आला आहे. कुलदीप सिंग आणि अक्षर पटेल हे दोन फिरकीपटू संघात आहेत. बीसीसीआयने (BCCI) पत्रकार परिषदेची वेळ जाहीर करताना साडेबारा वाजताची वेळ दिली होती. पण, प्रत्यक्षात ३ वाजता ती सुरू झाली. पण, त्या मानाने कोणतेही धक्के संघात नव्हते.

रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.