-
ऋजुता लुकतुके
कराची नॅशनल स्टेडिअमवर चॅम्पियन्स करंडकात सहभागी सगळ्या देशांचे राष्ट्रध्वज दिमाखात फडकले असताना भारताचा ध्वज मात्र तिथे नव्हता आणि त्यामुळे गेले दोन दिवस सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. झालं असं की, कराची नॅशनल स्टेडिअम, जिथे चॅम्पियन्स करंडकातील उद्घाटनाचा सामना रंगणार आहे, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात स्टेडिअमवर सर्व सहभागी देशांचे ध्वज लावलेले दिसत आहेत. पण, त्यात भारताचा ध्वज नाही. हा व्हिडिओ अधिकृत आहे की, नाही हे अजून समजलेलं नव्हतं. पण, पाकिस्ताननेच आता या मुद्यावर सारवासारव केली आहे. ‘भारतीय संघ पाकिस्तानला येणार नसल्याने त्यांचा ध्वज मैदानात लावला नाही,’ असं त्यांचं म्हणणं आहे. (Champions Trophy 2025)
कराची बरोबरच रावळपिंडी आणि लाहोर इथं चॅम्पियन्स करंडकाचे सामने होणार आहेत आणि या तीनही मैदानांवर भारताचे ध्वज नसल्याचं पाक क्रिकेट मंडळातील सूत्रांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना मान्य केलं. पण, त्याला वरील कारण मात्र दिलं. ‘भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तर बांगलादेशचा संघही अजून इथं आलेला नाही. ते आपला पहिला संघ दुबईतच खेळणार आहेत. म्हणून या दोन देशांचे ध्वज मैदानांवर नाहीत,’ असं या सूत्राचं म्हणणं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवळील चौकात Jawaharlal Darda यांचा बसवणार अर्धपुतळा)
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations.
– Absolute Cinema,… pic.twitter.com/2zmcATn7iQ
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) February 16, 2025
भारतीय संघाने पाकिस्तानला जायला नकार दिल्यानंतर आयसीसीने या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल अंगीकारलं आहे. त्यानुसार भारतीय संघ पाकिस्तानमध्ये नाही तर दुबईत आपले सर्व सामने खेळणार आहे. तेच कारण पाकिस्तानने पुढे केलं आहे. पाक मंडळाचा सूत्र पुढे म्हणतो, ‘ज्या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स करंडकाचे सामने होणार आहेत, तिथे सर्व कर्णधाराची पोस्टर लावण्यात आली आहेत आणि त्या पोस्टरमध्ये भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचाही फोटो आहे. (Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ८ वर्षांनंतर पहिल्यांदा होत आहे. तर पाकिस्तानमध्ये १९९६ नंतर होणारी ही पहिलीच आयसीसी स्पर्धा असेल.’ (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community