Champions Trophy 2025 : टीम इंडिया की न्यूझीलंड ; कोणता विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार ?

78
Champions Trophy 2025 : टीम इंडिया की न्यूझीलंड ; कोणता विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार ?
Champions Trophy 2025 : टीम इंडिया की न्यूझीलंड ; कोणता विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार ?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडिया विरूध्द न्यूझीलंड (India vs New Zealand) खेळणार आहे. हा सामना दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांचा हा तिसरा आणि अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत आधीच प्रवेश मिळवला आहे. (Champions Trophy 2025)

पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी
आज 2 मार्चला होणारा सामना जिंकून ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच उपांत्य फेरीच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकून न्यूझीलंडच्या पराभवाच्या उधारीची परतफेड करण्याची नामी संधी आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळवून या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे. (Champions Trophy 2025)

न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजय मिळवला नाही
टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थान सुनिश्चित असल्याने भारतीय चाहत्यांना चिंता नाही. मात्र टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी पाहिली तर चाहत्यांची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारीच तशी आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) इतिहासात आतापर्यं इतर संघांवर विजय मिळवला आहे. मात्र टीम इंडियाला आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. (Champions Trophy 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.