Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात तीनदा आमने सामने येणार भारत-पाकिस्तान?

Champions Trophy 2025 : २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. 

165
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात तीनदा आमने सामने येणार भारत-पाकिस्तान?
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. बीसीसीआयने अजूनही या स्पर्धेत सहभागासाठी सहमती दिलेली नाही. भारतीय संघाचे सामने त्रयस्थ ठिकाणी ठेवावेत अशीच विनंती आयोजकांना आणि आयसीसीकडे केली आहे. दुबई किंवा श्रीलंकेत भारताचे सामने आयोजित करण्यात यावे, अशी भूमिका बीसीसीआयची असल्याच्या चर्चा आहेत. पण, त्याचवेळी पाकिस्तानने या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली असून वेळापत्रकही तयार केलं आहे. त्यांनी केलेल्या नियोजनानुसार, भारत आणि पाकिस्तानचे संघ संपूर्ण स्पर्धेत तीनदा आमने सामने येऊ शकतील. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांच्या सामन्यांना प्रचंड गर्दी होते. तसंच लोकांमध्ये उत्सुकताही खूप असते. याचा विचार करूनच ही आखणी करण्यात आल्याचं समजतंय. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

भारतात २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पहिल्या आठ स्थानांवर असलेल्या संघांना चॅम्पियन्स करंडकात प्रवेश मिळाला आहे. या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश या संघांचा अ गटात समावेश आहे. ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा समावेश आहे. दोन्ही गटातील दोन टॉप संघ सुपर ४ मध्ये जातील. सुपर ४ मधून दोन संघ अंतिम फेरीत जातील.

भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात आहेत. यामुळं भारत आणि पाकिस्तान १ मार्च २०२५ ला आमने सामने येतील. दोन्ही संघांनी सुपर ४ मध्ये प्रवेश केल्यास तिथं दोन्ही संघ आमने सामने येतील. भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये टॉप २ मध्ये राहिल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – “तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे नेते…” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा पलटवार)

ही आहे भारताची भूमिका 

भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी न जाण्याची भूमिका घेतलेली आहे. बीसीसीआयच्या मागणीनुसार हायब्रीड मॉडेल आयसीसीनं लागू केल्यास भारत या स्पर्धेत सहभागी होईल. भारतानं त्रयस्थ ठिकाणी सामने खेळण्याची तयारी दर्शवली आहे. दुबई आणि श्रीलंकेतील एका ठिकाणी सामने खेळवावेत, अशी भारताची भूमिका आहे. पाकिस्तानची भूमिका संपूर्ण स्पर्धा आपल्या देशात व्हावी, अशी इच्छा आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सुरक्षेच्या कारणानुसार भारताचे सामने लाहोरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या विरोधात सामने खेळेल. पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात आयसीसीला सोपवलेल्या वेळापत्रकानुसार १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.