Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड १८ जानेवारीला?

Champions Trophy 2025 : बीसीसीआयने आयसीसीकडे तशी विशेष मुदतवाढ मागितली आहे.

30
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड १८ जानेवारीला?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी आता पुढील दोन महत्त्वाच्या मालिका आहेत त्या इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय आणि टी-२० मालिका, तसंच पाकिस्तानमध्ये होणारा चॅम्पियन्स करंडक. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड ठरल्याप्रमाणे होणार आहे. पण, चॅम्पियन्स करंडकासाठी बीसीसीआयने आयसीसीकडून खास मुदतवाढ मागून घेतल्याचं समजतंय. एरवी संघ निवडीची मुदत १२ जानेवारी होती. पण, भारतीय संघ १८ किंवा १९ जानेवारीला घोषित होऊ शकतो. काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे अहवाल अजून आलेले नाहीत, असं बीसीसीआयचं सांगणं आहे. (Champions Trophy 2025)

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी होणार आहे, पण ते त्यांचे सामने पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये होतील. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. त्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या फक्त या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर होईल आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडकासाठी संघ निवड जाहीर होईल. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – First Anniversary of Ram Mandir : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा)

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेचा संघ आधी जाहीर होईल अशी माहिती आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची तंदुरुस्ती हा संघासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठीच हा वेळ लागणार आहे. शमी एकदिवसीय सामने खेळू शकेल का याचा अंदाज वैद्यकीय चमूला अजून आलेला नाही. तर बुमराहच्या दुखापतीचं नेमकं स्वरुपही उघड झालेलं नाही. (Champions Trophy 2025)

आयसीसीच्या नियमांनुसार, प्रत्येक स्पर्धेसाठी संघाची घोषणा एक महिना आधी करावी लागते. परंतु यावेळी संघाची यादी प्रत्येकाकडून पाच आठवडे आधीच मागवण्यात आली आहे. तथापि, आता फक्त तात्पुरत्या संघांची घोषणा केली जाईल आणि जर कोणत्याही संघाला दुखापतीमुळे काही बदल करायचे असतील तर त्यांना नंतर वेळ मिळेल. क्रिकबझच्या मते, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा तात्पुरता संघ एका आठवड्यानंतर १८-१९ जानेवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश असेल. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Municipal Elections : शिवसेना उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया)

क्रिकबझने आपल्या अहवालात असंही म्हटलं आहे की, भारतासाठी टी-२० नियमितपणे खेळणारा अर्शदीप सिंगला यंदा एकदिवसीय सामन्यात संधी मिळू शकते. त्याच वेळी, दुखापतीमुळे एक वर्षापेक्षा जास्त काळ भारतीय संघातून बाहेर असलेला मोहम्मद शमी देखील इंग्लंड मालिकेत पुनरागमन करू शकतो. तथापि, शमी टी-२० सामने खेळेल की नाही हे निश्चित नाही, परंतु तो एकदिवसीय आणि नंतर चॅम्पियन्स करंडकात दिसू शकतो. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.