- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये प्रस्तावित असलेल्या चॅम्पियन्स करंडकाचं नेमकं काय होणार याचा फैसला आता २९ तारखेला आयसीसी सदस्य देशांच्या ऑनलाईन होणाऱ्या बैठकीत होणार आहे. भारताने हायब्रीड मॉडेलची मागणी केली आहे. तर पाकिस्तानने सगळे सामने तिथेच व्हावेत अशी आग्रहाची मागणी केली आहे. इतकंच नाही तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी नुकताच आयसीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जय शाह यांना खरमरीत इशारा दिला आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?)
जय शाह १ डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ‘शाह यांनी भारताचा विचार न करता आयसीसीचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या हिताचा आणि सदस्य देशांचा विचार करून निर्णय घ्यावा,’ असं विधान नकवी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे. याचा अर्थ उघड आहे की, पाकिस्तानचा अजूनही हायब्रीड मॉडेला विरोध आहे. पण, आता पाकिस्तानच्या विरोधात एक नाही तर अनेक गोष्टी गेलेल्या दिसतात. नकवी यांनी हे विधान केलं त्याच्या एकच दिवस आधी श्रीलंकन ए संघ पाकिस्तानमधून दौरा अर्धवट टाकून मायदेशी परतला आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण अस्थिर आहे आणि सरकारविरोधी राजकीय आंदोलनं सुरू आहेत. अशावेळी सुरक्षिततेच्या कारणावरून श्रीलंकन अ संघाने उर्वरित २ एकदिवसीय सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – मंत्रीपद, विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची Ramdas Athawale यांची मागणी)
पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या समर्थनार्थ राजकीय आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे राजधानी इस्लामाबाद ही लॉकडाऊनमध्ये आहे. बाहेरून कुणाला प्रवेश दिला जात नाहीए. पण, इमरान समर्थक आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारणावरूनच लंकन संघ माघारी परतला आहे. अशावेळी पाकिस्तान आपला आयोजनाचा हट्ट किती वेळ चालवू शकतो हा प्रश्नच आहे. १९९६ मध्ये पाकिस्तानने आपली शेवटची आयसीसी स्पर्धा भरवली होती. भारत आणि श्रीलंकेबरोबर संयुक्त विश्वचषक आयोजन इथं पार पडलं होतं. अंतिम सामनाही लाहोर इथं झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आयोजनाची संधी चालून आली आहे. पण, भारतीय संघाने स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community