-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात सगळ्यांना उत्सुकता आहे ती २३ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. आणि त्यासाठी पॉल रायफल आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे आयसीसीचे सगळ्यात अनुभवी पंच मैदानावरील पंच म्हणून काम पाहणार आहेत. या सामन्यासाठी मायकल गॉ हे तिसरे पंच असतील. म्हणजेच टीव्ही रिप्ले पाहून निकाल देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. चौथे पंच म्हणून ॲड्रियन होल्डस्टॉक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सामनाधिकारी असतील माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड बून. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश )
फक्त भारत विरुद्ध पाकिस्तानच नाही तर चॅम्पियन्स करंडकातील सर्वच्या सर्व १२ सामन्यांसाठीच्या पंचांची घोषणा आयसीसीने केली आहे. १९ फेब्रुवारीला कराचीत या स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात रिचर्ड केटलबरो तसंच शर्फुद्गोला इब्न शहीद हे मैदानावीरल पंचांची भूमिका पार पाडतील. जोएल विल्सन टीव्ही पंच असतील. तर अँड्र्यू वार्फ गरज पडल्यास चौथ्या पंचांची जबाबदारी पार पाडतील. २०१७ नंतर पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. (Champions Trophy 2025)
यंदा पाकिस्तान आणि दुबईत संयुक्तरित्या स्पर्धेचं आयोजन होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला जायला नकार दिल्यानंतर हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आलं असून भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर उपान्त्य आणि अंतिम सामनाही दुबईतच होईल. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Dahisar Toll Plaza : … तर टोलनाका फोडणार; वाहतूक कोंडीवरील उपाययोजना न केल्याने परिवहनमंत्री संतापले)
१९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल ८ संघ यात सहभागी होणार आहेत. साखळी आणि अंतिम मिळून एकूण १५ सामने रंगणार आहेत. भारताचा समावेश अ गटात आहे. आणि यात भारताबरोबरच पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश हे संघ असणार आहेत. भारताच्या सामन्यांसाठीचे पंच आणि टीव्ही पंच पाहूया, (Champions Trophy 2025)
२० फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश – मैदानावरील पंच – ॲड्रियन होल्डस्टॉक व पॉल रायफल, टीव्ही पंच – रिचर्ड इलिंगवर्थ
२३ फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान – मैदानावरील पंच – पॉल रायफल व रिचर्ड इलिंगवर्थ, टीव्ही पंच – मायकेल गॉ
२ मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड – मैदानावरील पंच – मायकेल गॉ व रिचर्ड इलिंगवर्थ, टीव्ही पंत – ॲड्रियन होल्डस्टॉक
हेही पहा-
Join Our WhatsApp Community